श्रेयस तळपदेची रिअल लाईफ परी कोण माहितीये का? पाहा त्याच्या लेकीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 03:50 PM2021-09-25T15:50:37+5:302021-09-25T15:58:52+5:30

Shreyas talpade: मालिकेत परीचा मित्र असलेल्या श्रेयसच्या खऱ्या आयुष्यातदेखील त्याची एक लहानशी मैत्रीण आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. मराठीसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या नवाचा डंका वाजवल्यानंतर श्रेयस पुन्हा एकदा मराठी मालिकांकडे वळला आहे.

'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून त्याने तब्बल १७ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं आहे.

या मालिकेत श्रेयस महत्त्वापूर्ण साकारत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि बालकलाकार मायरा वायकुळदेखील स्क्रीन शेअर करत आहे.

मालिकेमध्ये परी आणि तिच्या फ्रेंडची मैत्री साऱ्यांनाच पाहायला मिळते. मात्र, ऑफस्क्रीन सुद्धा श्रेयस आणि मायराची गट्टी आहे.

विशेष म्हणजे मालिकेत परीचा मित्र असलेल्या श्रेयसच्या खऱ्या आयुष्यातदेखील त्याची एक लहानशी मैत्रीण आहे.

श्रेयसच्या खऱ्या आयुष्यातील मैत्रीण म्हणजे त्याची लेक.

श्रेयसला एक चिमुकली मुलगी असून तिचं नाव आद्या असं आहे.

श्रेयसची मुलगी खूप लहान असून अनेकदा तो तिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

श्रेयस तळपदेचं संपूर्ण कुटुंब

पत्नी आणि मुलीसोबत श्रेयस