नवरा कसा पाहिजे? चाहत्याच्या प्रश्नाला गौतमी देशपांडेचं सॉलिड उत्तर

Published: May 12, 2021 04:44 PM2021-05-12T16:44:12+5:302021-05-12T16:59:01+5:30

Gautami Deshpande : ‘माझी होशील ना’ या मालिकेतील सई अर्थात गौतमी देशपांडेनं चाहत्यांना सांगितलं गुपीत

‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली, चाहत्यांची आवडती गौतमी देशपांडे आता हिची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. (PICS: Gautami Deshpande/Instagram)

अल्पावधीत ती प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या गोजरा चेहरा आणि दमदार अभिनय या जोरावर गौतमीने मोठा चाहतावर्ग मिळवला.

फावल्या वेळात गौतमीचा बराचसा वेळ सोशल मीडियावर जातो. आता अशात चाहत्यांचे प्रश्न तर असणारच. शेवटी आपल्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही?

अलीकडे गौतमीने इन्स्टा लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी गौतमीच्या एका उत्तराने सर्वांनाच क्लिनबोल्ड केले.

होय, तुला कसा नवरा हवा? असा प्रश्न एका चाहत्याने गौतमीला केला.

यावर, चांगला हवा ना, असे भन्नाट उत्तर गौतमीने दिले. तिच्या या उत्तराची चर्चा झाली नसेल तर नवल.

आवडता गायक कोण? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने बॉलिवूड सिंगर सोनू निगमचे नाव घेतले.

गौतमी ही प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मणी देशपांडे हिची बहिण आहे.

गौतमी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे़ आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

गौतमीएक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!