Maithili Thakur Birthday : आपल्या सुरेल आवाजाने फॅन्सना मंत्रमुग्ध करणाऱ्या मैथिली ठाकूरच्या खास गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 05:33 PM2020-07-25T17:33:54+5:302020-07-25T17:42:21+5:30

मैथिलीचा चाहतावर्ग आता इतका वाढला आहे की, तिचा कोणताही व्हिडीओ लगेच व्हायरल होतो. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.

देशात २०१७ पासून आपल्या सुरेल गायकीने श्रोत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या मैथिली ठाकुरचा आज वाढदिवस. मैथिलीचे गाण्याचे कितीतरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियात व्हायरल झालेले पाहिले असतील आणि तिचं गाणंही ऐकलं असेल. तिचा चाहतावर्ग आता इतका वाढला आहे की, तिचा कोणताही व्हिडीओ लगेच व्हायरल होतो. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ.

मैथिलीसोबत तिचे दोन भाऊ सुद्धा गायन आणि वादन करतात. महत्वाची बाब म्हणजे तिचे वडील रमेश ठाकुर हेच तिचे गुरू आहेत. त्यांनी तिला आण तिच्या भावांना गायन आणि वादन शिकवलं. बालपणापासूनच तिचं गाण्याचं शिक्षण सुरू झालं होतं.

मैथिली तिचा भाऊ अयाची आणि ऋषभ या त्रिकुटाला कुणी औळखत नाही असं कुणी सापडणार नाही इतके ते लोकप्रिय आहे. २०१७ पासूनच तिघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणे सुरू केले होते. त्यात मैथिलीने तिच्या जबरदस्त तयारीच्या गायकीने चाहत्यांना मंत्रमुग्द करणे सुरू केले.

आज मैथिलीच्या सोशल मीडिचा अकाउंट, पेज आणि व्हिडीओ चॅनेलवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. तिला फेसबुकवर ७.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती मधुबन बिहारची राहणारी आहे.

सध्या ती दिल्लीच्या द्वारकामध्ये राहते आणि भारती कॉलेज दिल्ली विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन करत आहे. भाऊ ऋषभ ११ वी मध्ये तर लहान भाऊ अयाचीी सातव्या वर्गात शिकत आहे.

मैथिली गाण्यासोबत वादनही करते. ती कीबोर्ड वाजवू शकते. पण तिला हार्मोनियमवर जास्त प्रेम आहे. तिच्या घरी १६ ते १७ हार्मोनियम आहेत. मैथिलीकडे जर्मनी, समोसा आणि पाली टाना हार्मोनियमचे प्रकार आहेत.

मैथिलीला गायन वादनासोबतच वेगवेगळ्या भाषेची आवड आहे. तिला नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर भाषेबाबत जाणून घेण्यात आणि ती शिकण्याचा प्रयत्न करण आवडतं. ती इंटरनेटच्या माध्यमातून भाषा शिकण्याचा प्रयत्न देखील करत असते.

मैथिलीची आणखी एक खासियत म्हणजे ती इंग्रजीसहीत अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये गाते. आज मैथिली एक मोठी स्टार सिंगर झाली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये ती कार्यक्रम करत असते. तिची खासियत म्हणजे ती वेगवेगळ्या प्रकारची गायकी करते जी चाहत्यांना आवडते. मैथिलीची लोकप्रियता अशीच दिवसेंदिवस वाढत राहो आणि ती अशीच आपलं सुमधूर आवाजाने मनोरंजन करत राहो ही सदिच्छा!