हास्यजत्रेचा तिसरा एपिसोड करत असताना समजलं मी प्रेग्नंट आहे आणि...; नम्रता संभेरावचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:23 PM2022-03-17T12:23:52+5:302022-03-17T13:47:12+5:30

Maharashtrachi Hasya Jatra, Namrata Sambherao : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये कधी लॉली, कधी बिहारी बुधिया, कधी इन्सपेक्टर आणि कधी आजीबाई बनणारी नम्रता संभेराव म्हणजे एक भन्नाट रसायन. नम्रताने नुकतीच ‘लोकमत सखी’ला खास मुलाखत दिली. यावेळी इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल ती भरभरून बोलली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये कधी लॉली, कधी बिहारी बुधिया, कधी इन्सपेक्टर आणि कधी आजीबाई बनणारी नम्रता संभेराव म्हणजे एक भन्नाट रसायन.

नम्रता स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुलू लागतात. स्किट कुठलंही असो, त्यात ती कॉमेडीचे असे काही रंग भरते की हसून हसून पोट दुखतं. या नम्रताने नुकतीच ‘लोकमत सखी’ला खास मुलाखत दिली. यावेळी इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल ती भरभरून बोलली.

नम्रताने शिवाजी विद्यालय काळाचौकी, येथून शालेय शिक्षण पूर्ण केलं. शाळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. या वातावरणात वाढल्यामुळे मला स्वत:ला एक्सप्लोअर करण्याची संधी मिळाली.

मग मोठी उडी मारून बघायला काय हरकत आहे? असा विचार करून ती स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. नववीत असताना पहिल्यांदा ‘बाजीराव मस्तानी’मधल्या मस्तानीचा एकपात्री अभिनय परफॉर्म केला. तिथे मला दुसरं प्राईज मिळालं आणि तिचा आत्मविश्वास वाढला.

अर्थात आपण कॉमेडी करू शकू, असा विचारही नम्रताने कधी केला नव्हता. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा शो तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. चार फायनलिस्टपैकी ती एक होते. तिथून नाव मिळालं मग कामं मिळायला लागली.

पण तोपर्यंत आपल्याला कॉमेडी करता येते याची तिला कल्पनाही नव्हती. मग फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन, नसते उद्योग या विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

लग्न झाल्यावर नम्रताच्या सासरकडून तिला कसा पाठींबा मिळाला तर सासरी तिला कधीच ‘तू हे कर किंवा हे करू नकोस’ अशी बंधनं घातली नाहीत. तिच्या पतीला या क्षेत्राची आवड होती. त्यामुळे त्यांनी तिला कधीच अडवलं नाही.

सासूनंही वेळोवेळी पाठिंबा दिला. ती म्हणते, फक्त एकदाच त्यांनी मला सांगितलं होतं की तू आम्हाला बाळ दे, पुढचं सगळं आम्ही पाहू. बाळ झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांच्या आतच तू घराबाहेर पडू शकतेस. बाळाचं अजिबात टेंशन घेऊ नकोस. त्यामुळे माझं करिअर घडण्यामागे माझ्या सर्पोटिव्ह कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे.

पुढे ती म्हणाली, महाराष्ट्राची हास्यजत्रा सुरू झाल्यानंतर दोन एपिसोड शूट झाल्यानंतर तिसºया एपिसोडच्या वेळेस मला कळंल की मी प्रेग्नंट आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. अशावेळी सोनी मराठीच्या टिमनं मला प्रचंड सपोर्ट केला.