PICS : ‘रंग माझा वेगळा’मधील चिमुकली कार्तिकी नक्की आहे तरी कोण? वाचा तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:00 PM2021-09-23T15:00:28+5:302021-09-23T15:13:19+5:30

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलीये. होय, दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत.

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलीये. होय, दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी आता मोठ्या झाल्या आहेत.

दीपिका व कार्तिकी या दोन्ही चिमुकलींनी सध्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. विशेषत: कार्तिकीनं तर सर्वांनाच लळा लावला आहे.

कार्तिकीची ही गोड भूमिका साकारणारी बालकलाकार कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज आम्ही तिच्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

तर कार्तिकीची ही भूमिका साकारणा-या चिमुकलीचं नाव आहे साईशा भोईर.

साईशा ही सोशल मीडियावरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचं स्वत:चं अकाऊंट आहे आणि विशेष म्हणजे, तिचे 91 हजारांहून अधिक फॉलोवर्सही आहेत. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनलही आहे.

साईशा ही मुंबईची. आईबाबासोबत ती कल्याणमध्ये राहते. आईबाबांसोबतचे अनेक फोटोही ती शेअर करते. तच्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये राहते.

साईशाच्या इन्स्टा अकाऊंटवर डान्सचे, जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ आहेत.

याआधी साईशाने काही ब्रँडसाठी रॅम्पवॉक केलं होतं. ‘रंग माझा वेगळा’ ही मात्र तिची पहिलीच मालिका.