| बिग बॉस 13 : अतिशय प्रशस्त आहे बिग बॉसचे नवं घर, पाहा घराचे Inside फोटो! | Lokmat.com
बिग बॉस 13 : अतिशय प्रशस्त आहे बिग बॉसचे नवं घर, पाहा घराचे Inside फोटो!
23rd Sep'19
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त शो बिग बॉसचा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या नव्या घराची सैर आम्ही तुम्हाला फोटोंच्या माध्यमातून घडवणार आहोत.घरात प्रवेश केल्यानंतर लागते ती प्रशस्त लिव्हिंग रुम. लिव्हिंग रुममध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर काम केले आहे. घरातील सदस्यांनी पॉझिटीव्ही एनर्जी देण्यासाठी विविध रंगाचा वापर करुन लिव्हिंग एरिया सजवण्यात आला आहे.
लिव्हिंग रुमच्या एका बाजूला आपल्याला जीने दिसतायेत. तर भीतींवर वेगवेगळ्या कलाकृतींचे फोटो लावले दिसत आहेत. यावेळी बिग बॉसने घरातला म्युझियमची थीम देण्यात आली आहे.
गेल्या काही सीझनमध्ये घरातील ज्या सदस्यांचे किंचनवर कंट्रोल होते ते स्पर्धेचे विनर ठरले होते. लिव्हिंग एरियाच्या बाजूलाच ओपन किचन आहे. हे किंचन अतिशय प्रशस्त आहे. किचनच्या छपरावर लाकडी कामाने सजावट करण्यात आली आहे. बिग बॉस कैफे असे किचन एरियाला नाव दिले गेले आहे.
प्रशस्त डायनिंग एरिया आपलं लक्ष वेधून घेतो. डायनिंग टेबलला चारही बाजूनी खुर्चांनी वेढले आहे. भींतीवर विविध प्राण्यांचे पेटिंग केले गेले आहे.
बाथरुमचा प्रवेश केल्यानंतर लक्ष वेधून घेतायेत ती डोळ्यांच्या आकाराचे आरासे. गुलाबी रंगाच्या लाईट्सचा वापर करुन बाथरुम सजवण्यात आला आहे.
यावेळेचे बाथरुम एरिया खूपच हटके आहे. बाथरुममध्ये झालर लावल्यासारखी लाईटिंग करण्यात आली आहे. बाथरुमच्या एका कोपऱ्यात पॅराशूटसारख्या आकार देऊन एक बसण्याची जागा बनवण्यात आली आहे.
बेडरुम वेगवेगळ्या रंगांच्या मदतीने सजवण्यात आली आहे. दिवसभराचे टास्क खेळून तुम्हाला याठिकाणी आल्यावर निवांत झोप लागले याची काळजी नक्कीच बिग बॉसकडून घेण्यात आली आहे.
बिग बॉसचे घर ओमंग कुमार यांनी हे घर तब्बल 18500 स्केअर फुटांवर डिझाईन केले आहे. हे घर पाहुन त्यातील केवळ सदस्यच नाही तर प्रेक्षक ही त्याच्या प्रेमात पडतील. घरात एकूण 93 कॅमेरा बसविण्यात आले आहेत.
Bigg Boss Season 13 soon be released. Check inside photos of Bigg Boss 13 house. Not only the members of the house but also the audience will fall in love with it. A total of 93 cameras have been installed in the house.