Good News! लॉकडाउनमुळे पुन्हा एकदा 'रामायण' प्रेक्षकांच्या भेटीला, पहा त्यातील काही फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:26 IST2020-03-27T18:19:27+5:302020-03-27T18:26:06+5:30
Ramayana

रामायण आणि महाभारत या मालिकांना नव्वदीच्या दशकात चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या मालिका सुरू असताना लोक आपापल्या घरातच थांबत असत. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट असायचा.

सध्या देशात लॉकडाऊन असल्याने आपल्याला सगळीकडेच अतिशय शांत वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमुळे लोकांना रामायण आणि महाभारत या कार्यक्रमांची आठवण आली आहे.

रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांचे या काळात पुन्हा प्रक्षेपण केले जावे अशी मागणी सोशल मीडियावर होत होती आणि आता तर उद्यापासून प्रेक्षकांना रामायण ही त्यांची आवडती मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

या मालिकेचा पहिला भाग नॅशनल दूरदर्शनवर उद्या सकाळी नऊ वाजता आणि दुसरा भाग रात्री नऊ वाजता प्रक्षेपित केला जाणार आहे.

रामायण या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या.

या मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने साकारली होती.

त्या दोघांनीही आपल्या भूमिका इतक्या चांगल्या प्रकारे साकारल्या होत्या की, प्रेक्षक त्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडण्यासाठी जात असत.

या मालिकेने या दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तुम्हाला विश्वास बसणार नाही.

पण अरुण आणि दीपिका यांच्या दर्शनासाठी लोक रांगा लावत असत.

तसेच त्यांच्या दर्शनासाठी येताना देवळात ज्याप्रकारे आपण हार, अगरबत्ती, नारळ घेऊन जातो, त्याप्रमाणे लोक घेऊन येत असत.

नव्वदीच्या दशकातील ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा भेटीला येत आहे.

त्यामुळे प्रेक्षक खूप खूश आहेत

पुन्हा एकदा रामायण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत

नक्की लुटा रामायणाचा आनंद

















