कुणी वडील गमावले, कुणी गमावला भाऊ ; कोरोनाने हिरावून घेतले या सेलिब्रिटींचे प्रियजन

Published: May 5, 2021 07:25 PM2021-05-05T19:25:38+5:302021-05-05T19:40:49+5:30

कोरोनाने अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले़. टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींवरही दु:खाचा डोंगर कोसळला.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता झैन इमामच्या चुलत भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे. झैनला 'नामकरण' या मालिकेसाठी ओळखले जाते.

अभिनेता गौरव चोप्राने कोरोनामुळे आपल्या वडिलांना गमावले. नुकतेच त्याच्या वडिलांचे निधन झाले.

अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या महिन्यात रिद्धिमाच्या आईची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्री स्रेहा वाघ हिच्या वडिलांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले.

बिग बॉस फेम निक्की तंबोली हिने कोरोनामुळे भावाला गमावले. काल 4 मे रोजी तिच्या भावाचे निधन झाले.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पिया वाजपेयी हिच्या भावाचे देखील करोनामुळे निधन झाले

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिच्या काकूचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले़

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्याजवळच्या दोन लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला.

दिवंगत अभिनेता इरफान खान याची पत्नी सुतापा सिकदर हिच्या अतिशय जवळच्या नातेवाइकाचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले.

बाबा सहगल याच्या वडिलांनाही कोरोनाने हिरावून घेतले़ अलीकडे बाबाने वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!