‘देवमाणूस’मधील डिंपलला एकदा पाहा तर...! ‘मेकओव्हर’ असा की पाहून थक्क व्हाल!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:17 PM2021-09-14T15:17:13+5:302021-09-14T15:22:53+5:30

देवमाणूस या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने डिंपलची भूमिका साकारली होती. मालिकेतील तिचा लुक तुम्ही पाहिलाच असेल. पण आत्ताचा तिचा मेकओव्हर बघून तुम्हीही थक्क व्हाल.

देवमाणूस ही मालिका संपली. पण मालिकेतील कलाकारांना तुम्ही इतक्या लवकरच नक्कीच विसरला नसाल. सध्या चर्चा आहे ती या मालिकेतील डिंपलची.. (pics- instagram)

होय, देवमाणूस या मालिकेत अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने डिंपलची भूमिका साकारली होती. मालिकेतील तिचा लुक तुम्ही पाहिलाच असेल. पण आत्ताचा तिचा मेकओव्हर बघून तुम्हीही थक्क व्हाल.

मालिकेनंतर अस्मिता घराघरात डिंपल म्हणून ओळखली जाऊ लागली. तिचा गावराना अंदाज प्रेक्षकांना फारच भावला होता. आता तिचे नवे फोटो तुम्ही एकदा पाहायलाच हवेत.

अस्मिताने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती बेबी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय.

अस्मिताचा जन्म पुण्यातील देहूचा. शालेय जीवनापासून अभिनयाची आवड असलेल्या अस्मिताला डिंपल या व्यक्तिरेखेने नवी ओळख दिली.

अस्मिताने काही शॉर्टफिल्म्स व म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. अस्मिता स्वप्निल जोशीची मोठी फॅन आहे.

अस्मिताने काही शॉर्टफिल्म्स व म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. अस्मिता स्वप्निल जोशीची मोठी फॅन आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!