Bigg Boss: बिग बॉसच्या घरात तग धरून राहणं आहे कठीण, हे ९ स्पर्धक झालेत जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 07:28 PM2020-10-17T19:28:38+5:302020-10-17T19:45:52+5:30

बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी बरेच टास्क पूर्ण करावे लागतात आणि या टास्कदरम्यान कित्येक कलाकार जखमी झाले आहेत.

बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी बरेच टास्क पूर्ण करावे लागतात आणिबिग बॉसच्या ९व्या सीझनमध्ये गिजेल ठकरासोबत असे काही झाले होते. गिजेल ठकरालच्या एका डोळ्याला जखम झाली होती. त्यानंतर तिचे सहस्पर्धक तिची मदत करताना दिसले होते. या टास्कदरम्यान कित्येक कलाकार जखमी झाले आहेत.

वाइल्ड कार्डने पुन्हा बिग बॉस १३च्या घरात आलेली हिमांशी खुराना एका टास्कदरम्यान बेशुद्ध झाले होते. यानंतर असीम रियाज खूप त्रस्त झाले होते.

बिग बॉस ८मध्ये लक्झरी बजेट टास्कदरम्यान धावताना करिश्मा तन्नाच्या डोक्याला दुखापत झाली होती.

बिग बॉस १३च्या वाइल्ड कार्डने एन्ट्री केलेला कंटेस्टंट अरहान खानला एका टास्कदरम्यान डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर तो टास्कमध्ये धक्काबुक्कीपासून स्वतःचा बचाव करू लागला होता.

मागील वर्षी सिद्धार्थ डे एका टास्कदरम्यान गंभीररित्या जखमी झाला होता.

गेल्या काही दिवसांमध्ये बिग बॉस १४च्या इम्युनिटी टास्कदरम्यान निशांत मखलानीच्या हाताला दुखापत झाली होती.

बिग बॉस १०चे विनर मनवीर गुर्जर एका टास्कदरम्यान घसरला होता.

बिग बॉस १४ची स्पर्धक सारा गुरपालच्या डोळ्याला खूप दुखापत झाली आहे. एका टास्कदरम्यान निक्की तांबोळीने तिच्या नखांनी सारा गुरपालवर वार केले होते.

देवोलिना भट्टाचार्जीचे बॅकपेन इतके वाढले होते की एका टास्कदरम्यान तिची तब्येत खूपच बिघडली होती. त्यानंतर निर्मात्यांनी तिला घरी पाठवून दिले होते.