सध्या काय करताहेत बिग बॉस १३चे सेलेब्रिटी?, कोणाला मिळालं काय काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:56 PM2020-03-06T16:56:47+5:302020-03-06T17:00:02+5:30

Bigg Boss 13

बिग बॉस १३चा सीझन संपल्यानंतर चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रेटींना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो ते सध्या काय करत आहेत.

सुरूवात करूयात बिग बॉस १३ चा स्टायलिश कंटेस्टंट आसिम रियाज एका म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात तो अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे.

हिमांशी खुराणा लवकरच एका म्युझिक व्हिडिओमध्ये तिचा खास मित्र आसिम रियाजसोबत दिसणार आहे आणि या अल्बमला नेहा कक्करने आवाज दिला आहे.

मधुरिमा तुलीबद्दल सांगायचं तर ती बिग बॉस शोमध्ये भांडणांमुळे प्रसिद्ध झाली होती. सध्या ती इश्क में मरजावां २ मालिकेत काम करताना दिसणार आहे.

माहिरा शर्मा एका रोमँटिक व्हिडिओ बारिशमध्ये तिचा मित्र पारस छाब्रासोबत झळकणार आहे. नुकतेच त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पारस छाब्रा बिग बॉस १३ शोनंतर मुझसे शादी करोगे या रिएलिटी शो करतो आहे. या शिवाय तो त्याची मैत्रिण माहिरा शर्मासोबत म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.

बिग बॉस १३मध्ये सर्वात जास्त चर्चेत आलेली स्पर्धक शहनाज गिल बिग बॉस संपताच दुसरा शो मुझसे शादी करोगीमध्ये व्यस्त झाले आणि आता ती स्वतःसाठी वर शोधते आहे.

सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस १३चा विजेता झाला. सध्या तो जिममध्ये घाम गाळताना दिसतोय आणि नवीन प्रोजेक्टच्या तयारीला लागला आहे.