मार्केटमध्ये आला 'कैदी चाय वाला', जेलमध्ये बसवून पाजतो 'प्रेमाचा चहा', फोटो Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:47 PM2022-12-15T15:47:05+5:302022-12-15T15:55:12+5:30

'कैदी चाय वाला' या दुकानात लॉकअपमध्ये ग्राहकांना चहाचा आस्वाद घ्यायला मिळतो.

बाजारात विविध प्रकारच्या चहाची दुकाने आणि टपऱ्या पाहायला मिळतात. "MBA चायवाला, ग्रॅज्युएट चायवाला, बेवफा चायवाला" असे विविध प्रकारचे चहावाले आहेत, ज्यांची सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगत असते. मात्र आता बाजारात एक नवीन चहा वाल्याची एन्ट्री झाली आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

खरं तर मार्केटमध्ये आता 'कैदी चाय वाला' या चहाविक्रेत्याने एन्ट्री केली आहे. हा चहावाला लॉकअपमध्ये बसवून चहा देण्याचे काम करतो. हे चहाचे दुकान बिहारच्या मुजफ्फरपुरमध्ये आहे, ज्याचे नाव 'कैदी चाय वाला' असे आहे.

या दुकानाची खासियत म्हणजे हे दुकान एखाद्या जेलप्रमाणे असून ग्राहक लॉकअपमध्ये चहाचा आस्वाद घेतात. लक्षणीय बाब म्हणजे एमबीए केलेल्या बिट्टू याने अशा नवीन संकल्पनेच चहाचे दुकान उभारले आहे. या कैदी चाय वाला दुकानात आल्यावर ग्राहकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.

बिट्टूचे हे दुकान एखाद्या लॉकअपप्रमाणे दिसते. दुकानाला लॉकअपसारखे डिझाइन करण्यात आले आहे. लोखंडी ग्रील लावून ते जेलसारखे बनवण्यात आले आहे.

एमबीए पूर्ण असलेला बिट्टू या दुकानाचा मालक आहे. त्याने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याला खूप दिवसांपासून चहाचे दुकान उघडायचे होते. पण त्याला काहीतरी नवीन करायचे होते. लॉकअपसारख्या चहाच्या दुकानाची कल्पना त्याला सुचली तेव्हा त्याने लगेच ती प्रत्यक्षात आणली आणि दुकान उघडले.

या दुकानाला 'कैदी चायवाला' असे नाव दिले आहे. आता त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चहासोबतच इतर खाद्यपदार्थही इथे मिळतात. तसेच चहाशिवाय या दुकानाचे नावही ग्राहकांना आपल्याकडे खेचत आहे.

एमबीएचे शिक्षण घेतलेल्या या तरूणाने त्याच्या सहकाऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. खरं तर त्याच्या या दुकानाच्या परिसरात इतरही चहाची दुकाने आहेत, मात्र दुकानाचे नाव आणि त्याची अनोखी शैली ग्राहकांना आकर्षित करत आहे.