साध्याभोळ्या भाऊची ग्लॅमरस लेक; बिंधास्त फोटोशूट करुन अभिनेत्रींनाही टाकतीये मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:00 AM2022-05-16T07:00:00+5:302022-05-16T07:00:02+5:30

Bhau kadam daughter:यात सध्या त्यांच्या थोरल्या लेकीचे फोटो चर्चेत येत आहेत. भाऊची मोठी मुलगी सोशल मीडियावर सक्रीय असून ती लोकप्रिय युट्यूबर आहे.

आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे भाऊ कदम.

रिअॅलिटी शो सह भाऊ काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही झळकला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तो कायम चर्चेत असतो.

कलाविश्वात सक्रीय असलेला भाऊ सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो.

यात सध्या त्यांच्या थोरल्या लेकीचे फोटो चर्चेत येत आहेत. भाऊची मोठी मुलगी सोशल मीडियावर सक्रीय असून ती लोकप्रिय युट्यूबर आहे.

भाऊच्या मोठ्या मुलीचं नाव मृण्मयी भालचंद्र कदम असं आहे. मृण्मयी सोशल मीडियावर अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत.

मृण्मयी सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींवर मात करत असून तिचा प्रत्येक फोटो चर्चेत येत असतो.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मृण्मयी वडिलांप्रमाणे कलाविश्वात पदार्पण करणार का? असा प्रश्नही तिला अनेकदा विचारण्यात येतो.

मृण्मयी खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. त्यामुळे ती तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.

भाऊची थोरली लेक मृण्मयी घरात प्रत्येकाचीच लाडकी असल्याचं पाहायला मिळतं.