इतका बदलला आहे नाळमधील चैत्या, त्याला ओळखणे देखील होतंय कठीण, पाहा त्याचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:21 PM2020-05-21T15:21:23+5:302020-05-21T17:47:18+5:30

नाळ या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात चैतन्य म्हणजेच चैत्याच्या भूमिकेत आपल्याला श्रीनिवास पोकळे या बालकलाकाराला पाहायला मिळाले होते.

नाळ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी श्रीनिवास केवळ आठ वर्षांचा होता.

श्रीनिवास सध्या त्याच्या अभ्यासाकडे लश्र केंद्रित करत असल्याने अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. पण तरीही तो इन्स्टाग्रामवर चांगलाच सक्रिय असून त्याच्या फॅन्सच्या संपर्कात राहातो.

श्रीनिवासच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात. तो आता पहिल्यापेक्षा खूपच वेगळा दिसत असून त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे.

श्रीनिवास पोकळे मूळचा अमरावतीचा असून तो सहावी इयत्तेत शिकत आहे.

श्रीनिवासने काही दिवसांपूर्वी झी मराठी वरील अळीमिळी गुपचिळी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

नाळ या चित्रपटात श्रीनिवासवर चित्रीत करण्यात आलेले जाऊ दे नवं हे गाणं चांगलंच गाजलं होतं.

नाळ या चित्रपटासाठी श्रीनिवासला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

नाळ या पहिल्याच चित्रपटाने श्रीनिवासला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासने सुधाकर रेड्डीची निर्मिती असलेल्या जॉर्ज रेड्डी या तेलुगु चित्रपटात काम केले होते. या चित्रपटासाठी त्याने तेलुगु भाषेचे धडेदेखील गिरविले होते.

श्रीनिवासला मोठे होऊन अभिनयक्षेत्रातच करिअर करायचे आहे. त्याने याविषयी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

नाळ या चित्रपटात श्रीनिवास सोबतच देविका दफ्तरदर, नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

श्रीनिवास आता चांगलाच मोठा झाला असून तो खूपच वेगळा दिसायला लागला आहे.

टॅग्स :नाळNaal Movie