'Bigg Boss'फेम अभिजीत केळकरच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का? पत्नी दिसते खूपच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 02:16 PM2021-10-17T14:16:53+5:302021-10-17T14:22:53+5:30

Abhijeet kelkar : सध्या अभिजीतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. अभिजीतने हे फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

Bigg Boss Marathi 2 च्या माध्यमातून विशेष प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. बिग बॉसमध्ये झळकलेल्या अभिजीतने मराठीतील 'तुझे माझे जमेना', 'मधु इथे आणि चंद्र' तिथे अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिजीतने 'काकस्पर्श', 'बालगंधर्व' या गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

आज अभिजीत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची कायमच चर्चा रंगत असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधणारा अभिजीत अनेकदा त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर करत असतो.

सध्या अभिजीतच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चिले जात आहेत. अभिजीतने हे फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

अभिजीतच्या पत्नीचं नाव तृप्ती केळकर असं आहे.

अभिजीतने त्याच्या लग्नातील अनेक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने त्याच्या लग्नातील काही फोटो शेअर करत पत्नीला तृप्तीला शुभेच्छा दिल्या होत्या.

अभिजीतने शेअर केलेले लग्नातील काही विधींचे फोटो

अभिजीत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याच्या स्वभावातील साधेपणा कायमच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो.

अभिजीत आणि तृप्ती लग्नातील काही विधी करत असताना