रवी जाधवच्या पत्नीपुढे अभिनेत्रीही फेल; पाहा मेघना जाधवचे झक्कास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 10:46 AM2021-09-19T10:46:59+5:302021-09-19T10:53:00+5:30

Meghana jadhav : रवी जाधवच्या पत्नीचं नाव मेघना जाधव असून मेघना ही रवीच्या मित्राचीच बहीण आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून कायमच रवी जाधवकडे पाहिलं जातं. 'नटरंग' या मराठी संगीत नाटकातून दिग्दर्शनाची सुरुवात करणारा रवी कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. मात्र, यावेळी सोशल मीडियावर त्याच्या पत्नीची चर्चा रंगली आहे.

रवी जाधवच्या पत्नीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

रवी जाधवच्या पत्नीचं नाव मेघना जाधव असून मेघना ही रवीच्या मित्राचीच बहीण आहे.

मित्राला भेटण्याचं निमित्त करुन रवी मुद्दाम मित्राकडे जात असे. ज्यामुळे त्याची मेघनासोबतही भेट होई. याच भेटीचं प्रेमात रुपांतर झालं. आणि, १४ फेब्रुवारीला रवीने मेघनाला प्रपोज केलं.

सुरुवातीच्या काळात मेघनाने ८०० रुपये पगारावर शिक्षिकेची नोकरी केली होती.

मेघना सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मेघनाने शेअर केलेला सुंदर फोटो

मेघनाला फिरण्याची प्रचंड आवड असून अनेकदा ती तिचे पर्यटनाचे फोटो शेअर करत असते.

दिवाळीनिमित्त मेघनाने शेअर केलेला सुंदर फोटो

वेस्टर्न आऊटफिटमध्ये ग्लॅमरस दिसणारी मेघना पारंपरिक कपड्यांमध्येही तितकीच सुंदर दिसते.

मेघनाने केलेलं खास फोटोशूट