धक्कादायक! जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री अँजेलिना जॉलीने ब्रॅड पिटवर लावले हिंसाचाराचे गंभीर आरोप, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:20 PM2021-03-18T15:20:34+5:302021-03-18T18:28:56+5:30

अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. विभक्त झाल्यानंतर 5 वर्षांनी अँजेलिना जोलीने ब्रॅड पिटवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. (Photo Instagram)

अँजेलिनाने यासंदर्भात न्यायालयात नवीन कागदपत्रे दाखल केली आहेत. कोर्टात घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अँजेलिनाने ब्रॅड पिटने घरगुती हिंसाचार केला आणि या गोष्टींचा पुरावेदेखील सादर केले. (Photo Instagram)

अँजेलीना जोलीने 12 मार्च रोजी न्यायालयात याचिका सादर केली. या अहवालानुसार अँजेलिनाने याचिकेत म्हटले आहे की, जर पुरावा हवा असेल तर तो मी कोर्टाकडे सुपूर्द करण्यास तयार आहे. (Photo Instagram)

न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार अँजेलीना या प्रकरणात तिच्या अल्पवयीन मुलांचीही साक्ष देण्याची तयारी दाखवली आहे. (Photo Instagram)

अँजेलीना जोली आणि ब्रॅड पिट यांना सहा मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जहरा, शिलोह, नॉक्स आणि विवियन अशी या मुलांची नावे आहेत. (Photo Instagram)

अँजेलिना आणि ब्रॅड 2005 पासून एकत्र होते. मिस्टर अँड मिसेस स्मिथ आणि बाय द सी या चित्रपटात ते एकत्र दिसले. (Photo Instagram)

त्यांची केमिस्ट्री चाहत्यांनी भावली. त्यांच्या नात्याची चर्चा हॉलिवूडमध्ये बराच काळ चालली. (Photo Instagram)