IPL 2020 : लाईक्स, कमेंट्स अन् गप्पाटप्पा; पृथ्वी शॉ अभिनेत्रीला करतोय 'डेट'?

भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वासाठी सज्ज होत आहे.

दुबईला दाखल झालेला पृथ्वी सोशल मीडियावरही फार अॅक्टीव्ह आहे. त्याच्या वर्क आऊटचे व्हिडीओ तो पोस्ट करतो. पण, त्याच्या याच पोस्टवरून सध्या भलत्याच चर्चेला उधाण आले आहे.

पृथ्वीच्या पोस्टवर एक अभिनेत्री सातत्यानं लाईक्स अन् कमेंट्स करत आहे. इतकेच नाही, तर पृथ्वीही तिच्या कमेंट्सवर प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे.

आता त्या अभिनेत्री अन् पृथ्वीच्या या गप्पा-टप्पांवरून नेटिझन्सनी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

टीम इंडियाचा भविष्याचा ओपनर म्हणून पृथ्वीकडे पाहिले जात आहे. त्यानं आतापर्यंत 4 कसोटी व 3 वन डे सामन्यांत अनुक्रमे 335 व 40 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 1 शतक व 2 अर्धशतकं आहेत.

मुळचा मुंबईचा, परंतु IPL 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूनं 25 सामन्यांत 598 धावा चोपल्या आहेत.

2019च्या मोसमात त्यानं 16 सामन्यांत 353 धावा केल्या होत्या आणि 99 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. यंदा तो दमदार खेळ करण्यासाठी सज्ज आहे.

भारताच्या या भविष्यातील स्टार खेळाडूच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लाईक्स करणाऱ्या अभिनेत्रीचं नाव प्राची सिंह असे आहे. Colors TVवरील उडान या कार्यक्रमात तिनं काम केलं होतं.