१ एप्रिलपासून TDS, EPF सह पाच नियमांमध्य़े मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर पस्तावण्याची वेळ येईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:24 AM2021-03-14T11:24:44+5:302021-03-14T11:29:31+5:30

Income Tax: 5 Rules That Are Changing From April 1 : अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी मध्यम वर्ग किंवा सॅलरीड क्लाससाठी कोणताही दिलासा दिला नव्हता. मात्र, 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आयकर भरण्यापासून मुक्तता दिली होती.

आर्थिक वर्ष 2021-22 साठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केले. यामध्ये आयकर प्रणालीमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. हे बदल 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहेत.

अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी मध्यम वर्ग किंवा सॅलरीड क्लाससाठी कोणताही दिलासा दिला नव्हता. मात्र, 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांना आयकर भरण्यापासून मुक्तता दिली होती.

याचबरोबर आय़कर न भरणाऱ्यांसाठी कडक नियम बनविण्याबरोबरच या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणाही केली होती. जाणून घेऊया काय आहेत हे बदल...

Income Tax च्या नव्या नियमांनुसार 1 एप्रिल 2021 पासून वर्षाला 2.5 लाखांपेक्षा अधिक ईपीएफ कापला जात असल्यास त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर लागणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न अधिक आहे त्यांना मिळणारी कर सवलत तर्कसंगत बनविण्यासाठी ही घोषणा केली होती. 2 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्यांना याचा कोणताही फरक पडणार नाही

कर्मचाऱ्यांना सूट देण्यासाठी आणि आयकर भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी वैयक्तीक करदात्यांना आता 1 एप्रिल 2021 पासून आधीच भरलेला ITR फॉर्म दिला जाणार आहे. यामुळे Income Tax Return भरणे सोपे होणार आहे.

लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (LTC) व्हाऊचर स्कीम नवीन वर्षात लागू होणार आहे. ही स्कीम कोरोना लॉकडाऊनमुळे ज्या कर्मचाऱ्यांना एलटीसी टॅक्स बेनिफिट मिळू शकला नाही त्यांच्यासाठी लागू करण्यात आली आहे.

सुपर सीनियर सिटीझन्सना ITR फाइल करण्यास 1 एप्रिलपासून सूट देण्यात येणार आहे. यासाठी 75 वर्षे वय निश्चित करण्यात आले आहे. ही सूट पेन्शन किंवा एफडीच्या व्याजावर जगणाऱ्या वृद्धांसाठी असणार आहे.

ITR फाईल न केल्यास करदात्यांना दुप्पट TDS भरावा लागणार आहे. आयटीआर फईल न करण्याऱ्यांसाठी हा नियम कडक करण्यात आला आहे. तसेच त्यांना टीसीएसदेखील जास्त आकारण्यात येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. 31 मार्चपूर्वी, हे महत्त्वाचे काम आपल्याकडे करा, अन्यथा तुम्हाला व्यवहार करण्यास अडचण येऊ शकेल. 1 एप्रिलपासून बँकेत काही बदल होणार आहेत, त्यानुसार, जुन्या आयएफएससी (IFSC) आणि एमआयसीआर (MICR) कोडचा वापर ग्राहकांना करता येणार नाहीत.

Read in English