संपूर्ण भारताचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची संपत्ती किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 11:25 AM2024-02-01T11:25:37+5:302024-02-01T12:09:49+5:30

निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयाचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संपूर्ण देशाचे लक्ष असलेला भारताचा अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५ सादर केला. संपूर्ण देशाचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची संपत्ती किती असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊया त्यासंदर्भात...

निर्मला सीतारामन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील विश्वासू मंत्री आहेत. त्यांनी अर्थमंत्रालयाचा कारभार समर्थपणे सांभाळला आहे. राजकारणाआधी त्या लंडनमधील हॅबिटॅट सेंटरमध्ये सेल्सपर्सन म्हणून काम करत होत्या.

सीतारामन यांनी असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनीअर्स (यूके) येथे अर्थशास्त्रज्ञाचे सहाय्यक म्हणूनही काम केले. एका अहवालानुसार, सीतारामन यांच्या संपत्तीबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी कोणत्याही कर बचत योजनेत गुंतवणूक केलेली नाही.

एका अहवालानुसार, सीतारामन यांच्या संपत्तीबाबत सांगायचे झाल्यास, त्यांनी कोणत्याही कर बचत योजनेत गुंतवणूक केलेली नाही. निर्मला सीतारामन यांची ४ विविध बँकांमध्ये खाती आहेत. ज्यामध्ये सुमारे ८ कोटी ४४ लाख ९३५ रुपये आहेत, असे सांगण्यात आले आहे.

सितारामन या त्यांचे पती यांच्यासोबत राहत असलेल्या घराची किंमत सुमारे ९९.३६ लाख रुपये किमतीचे आहे. सितारामन यांच्या मालकीची सुमारे 16.02 लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे.