चालत्या फिरत्या महालासारखी आहे 'Pushpa'मधील हिरो अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन, किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 11:42 PM2022-01-22T23:42:07+5:302022-01-22T23:45:32+5:30

vanity van of Allu Arjun: सुपरहिट पुष्पा चित्रपटातील हिरो अभिनेता अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन ही चाकांवर चालणार चालता फिरता महाल आहे. या महालाला पाहून कुणाचेही डोळे विस्फारू शकतात.

सुपरहिट पुष्पा चित्रपटातील हिरो अभिनेता अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन ही चाकांवर चालणार चालता फिरता महाल आहे. या महालाला पाहून कुणाचेही डोळे विस्फारू शकतात. अल्लू अर्जुन फॅन्ससाठी नेहमीच व्हॅनिटी व्हॅनचे काही फोटो शेअर करत असतो. अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन रेड्डी कस्टम कारवाने डिझाईन केली होती.

या व्हॅनिटी व्हॅनची किंमत ७ कोटी रुपये एवढी आहे. अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन फॅल्केनच्या बाहेर आणि आत त्याच्या नावाची अद्याक्षरे AA लिहिलेली आहे. या व्हॅनिटी व्हॅनचे इंटिरियर ब्लॅक. व्हाईट आणि सिल्व्हर कलरने रंगवले गेले आहे.

अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये रेकलाइनर चेअरपासून लेदरची सीट, मोठा आरसा आणि मनोरंजनासाठी अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. अल्लू अर्जुन बहुतांशवेळा आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधूनच प्रवास करत असतो.

या व्हॅनिटी व्हॅनचा बाह्य भाग जेवढा अंतर्भागाप्रमाणेच सुंदर आहे. या व्हॅनला बाहेरून ब्लॅक कलर देण्यात आला आहे. तर आतून ब्लॅक, सिल्व्ह आणि ग्रे कलरने फिनिशिंग करण्यात आले आहे.

या व्हॅनिटी व्हॅनमधीन बाथरूमपासून रेस्ट रूमपर्यंत सर्व उत्तम पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे. या व्हॅनच्या आत अल्लू अर्जुनसाठी एक मोठ्या आकाराची ब्लॅक कलरची आरामदायी सीटही लावण्यात आली आहे. त्यावर अल्लू अर्जुन शूटिंग संपल्यानंतर आराम करतो.