एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'छपाक'वर 'या' कारणाने भारी पडला तानाजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 02:59 PM2020-01-15T14:59:53+5:302020-01-15T16:20:37+5:30

अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल यांचा सिनेमा 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोणचा 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले

दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यात 'तान्हाजी'ने कमाईच्या बाबतीत 'छपाक' ला मागे टाकले आहे.

'तान्हाजी' प्रदर्शित होताच या सिनेमाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले.या सिनेमाला 4540 स्क्रीन्स मिळाले व या सिनेमाने तब्बल 16 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली आहे.

अपेक्षेपेक्षा कमी ओपनिंग छपाकला मिळाली . 'छपाकला' भारतात 1700 तर परदेशात 460 एकूण २१६० स्क्रीन मिळाले असूनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी' इतकी नसली तरी चांगली कमाई करण्यात यश संपादन केले आहे.

दीपिकाचा जेएनयूमध्ये जाऊन तेथे विद्यार्थांना दिलेले समर्थनही रसिकांना चांगलेच खटकले व मंडळींनी 'छपाक'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे असा कुठलाही प्रकार 'तान्हाजी'च्या बाबतीत घडला नाही.

'छपाक' प्रदर्शनापूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सुरुवातीला 'छपाक'च्या दिग्दर्शकांवर संहिता चोरीचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या नावावरुन विविध प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेला 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा एक ऐतिहासिकपट आहे. आणि ऐतिहासिक चित्रपटांना भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही काळात प्रदर्शित झालेले 'मणिकर्णिका', 'पद्मावत', 'पानिपत', 'बाजिराव मस्तानी' यांसारख्या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली

छपाक हा सिनेमा लक्ष्मी अग्रवालच्या रिअल लाइफ घटनेवर आधारित आहे

'मदर इंडिया', 'बँडिड क्विन', 'मर्दानी' असे काही अपवादात्मक चित्रपट सोडले. तर इतर सर्व स्त्रीप्रधान चित्रपटांना फारसे यश मिळालेले नाही. 'छपाक' हा देखील एक स्त्री प्रधान चित्रपट आहे. आणि त्याला 'तान्‍हाजी' पेक्षा कमी प्रतिसाद आला

तान्हाजी मालुसरे या नावाचे वलय 'छपाक'वर भारी पडले. ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भारतीयांवर नेहमीच प्रभाव राहिला आहे.

छपाक हा एक बायोग्राफिक चित्रपट आहे. तर तान्हाजी हा एक अॅक्शन चित्रपट आहे. बॉलिवूडमध्ये अॅक्शनचित्रपटाला नेहमीच चांगली मागणी असते.