सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचा सीबीआयसमोर खुलासा, तो म्हणाला होता - 'मलाही मारलं जाईल...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:39 PM2020-09-17T12:39:09+5:302020-09-17T12:56:25+5:30

अजूनही या केसचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान एजन्सी सतत सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याची चौकशी करत आहेत. सिद्धार्थने सीबीआय दिलेल्या त्याच्या जबाबात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

सुशांत सिंह राजपूत केस गेल्या तीन महिन्यांपासून दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. सुशांतने १४ जूनला त्याच्या बांद्र्यातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नंतर मुंबई पोलीस ते बिहार पोलिसांनीही तपास केला होता.

पण या केसमध्ये नवं वळण तेव्हा आलं जेव्हा सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीसहीत काही लोकांवर एफआयआर नोंदवला. सुशांतच्या केसमध्ये १९ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय सुनावत या केसा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

सीबीआयच्या तपासादरम्यान या केसमधून ड्रग्सचा अ‍ॅंगल समोर आला आणि एनसीबीने सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, हाऊस स्टाफ दीपेश सावंतसहीत काही लोकांना अटक केली.

अशात अजूनही या केसचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान एजन्सी सतत सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी याची चौकशी करत आहेत. सिद्धार्थने सीबीआय दिलेल्या त्याच्या जबाबात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

रिपब्लिकच्या एका रिपोर्टनुसार, सिद्धार्थ म्हणाला की, दिशा सालियनच्या मुत्युनंतर सुशांतला जीवाची भिती वाटत होती. त्याने एजन्सीला सांगितले की, सुशांत म्हणाला होता की, 'मलाही मारलं जाईल'. त्यासोबतच पिठानी हेही म्हणाला की, दिशा सालियनच्या मृत्युनंतर सुशांत त्याची सुरक्षा वाढवण्याचा विचार करत होता.

सिद्धार्थने खुलासा केला की, रिया चक्रवर्तीने सुशांतचा लॅपटॉप आणि हार्ड ड्राइव्हसोबत घर सोडलं होतं. यात आता सीबीआय दिशा आणि सुशांतच्या मृत्युतील सर्वच लिंक्सचा तपास करू शकते.

दुसरीकडे रिया चक्रवर्ती सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. रिपोर्ट्सनुसार, रियाने चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील २५ ए लिस्टर नावांचा ड्रग्स केसमध्ये खुलासा केलाय.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. दिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याला सुरक्षा देण्यात द्यावी, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.

दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन रॉय तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्याचा जबाब दिशा सालियनच्या मृत्यूसाठी महत्त्वाचा आहे, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. रोहन रॉय हा आपला जीव वाचवण्यासाठी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे. त्याचा सीबीआयच्या चौकशीत जबाब महत्त्वाचा असल्याचं नितेश राणे यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, असा विश्वास देखील नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

न्यूज १८ लोकमतच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या ज्या १५ कोटी रुपयांबाबत तक्रार केली, ते पैसे सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या वडिलांच्या कंपनीत गुंतवले असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. श्रुतीच्या वडीलांची गारमेंटची मोठी कंपनी आहे. याप्रकरणी आता लवकरच तपास होणार आहे.