या ५५ प्रश्नांची उत्तरं देताना रिया चक्रवर्ती अडकली NCB च्या जाळ्यात; 'असं' पितळ उघडं पडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:21 PM2020-09-16T14:21:28+5:302020-09-16T16:07:13+5:30

अभिनेचा सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला तीन महिने पूर्ण झाले. गेल्या तीन महिन्यांपासून या केसशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या लोकांची कसून चौकशी केली जात होती. एनसीबी आणि सीबीआयनं तपास सुरू केल्यानंतर या केसला वेगळंच वळण आलं. ड्रँग्ससंबंधी अनेक मोठे खुलासे होत गेले. याप्रकरणी आतापर्यंत १० लोकांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) रियाला विचारलेल्या प्रश्नांची यादी माध्यमांच्या हाती लागली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय या प्रकरणाचा शेवटचा रिपोर्ट काही दिवसात देणार आहे. एनसीबीने रियाला असे कोणते प्रश्न विचारल्यामुळे तिचं पितळ उघडं पडलं या प्रश्नांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सुरूवातीला एनीसीबी तिच्या कुटूंबाबद्दल संपूर्ण माहिती विचारली. तुझा मोबाइल नंबर आणि तू तो कधीपासून वापरते आहेस? याबद्दलही विचारले. तू जैद विलात्राला ओळखतेस का? तू कैजानला ओळखतेस का? हो तर त्याबद्दल सगळी माहिती दे. त्यानंतर तू अब्दुल बासित परिहारला ओळखते का? आणि सॅम्युअल मिरांडाला ओळखते का? याबाबत विचारणा करण्यात आली.

सॅम्युअल मिरांडाला ओळखते का? शोविक आणि तुझ्यामध्ये किती बॉडिंग आहे? शोविकच्या वैयक्तिक आयुष्यााबाबत तुला कितपत माहिती आहे? शोविक आणि सुशांतची भेट कुणी आणि कशासाठी करून दिली होती? तू, तुझे वडील, भाऊ शोविक आणि सुशांत ड्रग्ज घेत होतात का?

तुमच्या पवाना ट्रिपबाबत माहिती दे, जिथं तू सुशांतसह गेली होती. ड्रग्जबाबत काय झालं होतं? ड्रग्जची खरेदी-विक्री कोण कोण करायचं? तुझ्यापर्यंत ड्रग्स कोण पुरवायचं. पहिल्यांदा तू सॅम्युअल मिरांडाला कुठे आणि कशी भेटली होती?

केफरी हाइट्स रेसिडेन्सच्या सुशांतच्या घरीवर तू किती वेळा गेली होती आणि किती वेळा तिथं राहिली? तू तिथं ड्रग्जबाबत काही बघितेलं का? मिरांडाने सांगितल्यानुसार, तू सुशांतचा संपूर्ण घरखर्च पाहायची याबाबत सगळं सांग.

तू सांगितल्याप्रमाणे सुशांत ड्रग्ज घ्यायचा मग तू याच्यात सहभागी का झालीस? त्याच्यासाठी ड्रग्ज विकत का घेत होतीस का? ड्रग्ज खरेदीसाठी तू तुझ्या कार्डचाही अनेकदा वापर केला आहेस. तुझ्या कार्ड्सचे डिटेल्स दे.

तू मिरांडाला नोकरीवरून काढून का टाकलं होतं? सुशांत आपला कुक अशोकमार्फत स्वस्त दरातील ड्रग्ज खरेदी करत होता, ज्याची किंमत जास्त दिली जात होती. हे समजल्यानंतर तू मिरांडाला नोकरीवरून काढलं आणि ड्रग्ज खरेदीचे व्यवहार स्वत: हाताळू लागली, असं मिरांडा तुझ्याबाबत म्हणाला आहे.

5 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 पर्यंत मिरांडा आणि शोविकदरम्यानचे व्हॉट्सअॅप चॅट्सबाबतही रियाला प्रश्न विचारण्यात आले. ड्रग्ज विकत घेण्यासाठी स्वत:चाही पैसा लाव असा सल्ला तू शोविकला एका चॅटमध्ये का दिला? मिरांडाला ड्रग्ज खरेदी करण्यासाठी तुझ्या डेबिट कार्डचा वापर करायला का दिलास?

सुशांतसह तू आपल्या भाऊ शोविकला गोवा, लडाख, दिल्ली आणि युरोप ट्रिपवर का घेऊन गेलीस? या ट्रिपमध्ये शोविक एका आठवड्यानंतर आला आणि एक आठवडाआधीच निघून गेला होता? तू त्याला सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करायला का सांगायची?

तू ड्रग्ज घेतेस का? BUD, HASH, WEED घेतलं आहे? तुझ्या चॅट रेकॉर्डनुसार तू सुशांतसाठी ड्रग्जचा स्टॉक मॅनेज करायची याबाबत सांग. 17 एप्रिलला WEED चा एक स्टॉक जैदमार्फत मिरांडाने खरेदी केला? शोविकने मिरांडााल असं करायला सांगितलं होतं? तुझ्या बँक खात्याचे डिटेल्स दे. तुझ्या कमाईचा सोर्स काय? 16 एप्रिल 2020 ते 17 एप्रिल 2020 दरम्यानच्या तुझ्या आणि शोविकमध्ये जो व्हॉट्स अॅप चॅट झाला त्यावर काय स्पष्टीकरण देशील.

तुझ्यासमोर सुशांतने किती वेळा ड्रग्ज घेतले? तू यामध्ये किती वेळा मदत केली? 17 एप्रिल 2020 ला शोविकने वासिदमार्फत सुशांतसाठी HASH खरेदी केलं होतं, याबाबत तुला काय सांगायचं आहे? तू शोविकला ड्रग्जच्या स्टॉकबाबत माहिती करायला सांगितली होतीस. त्यासाठी शोविक मिरांडा आणि दीपेशला भेटला होता.

. जेव्हा ड्रग्जची डिलीव्हरी झाली तेव्हा तुझ्या सांगण्यानुसार दीपेशने ती डिलीव्हरी घेतली. जर सुशांत फक्त BUDS आणि WEED घेत होता तर मग तू त्याला HASH देण्यासाठी तयार का झाली?

ड्रग्ज खरेदीसाठी पैसे कोण दयायचं? कशामार्फत पेमेंट व्हायचं? तू कधी वासिदला BUD, HASH आणि WEED घेताना पाहिलं? 2019 सालच्या सुरुवातीच्या आठवड्यात आणि शेवटच्या आठवड्यात जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होता तेव्हा तू त्याला किती वेळा ड्रग्ज दिले होते. यादरम्यान खरेदीविक्रीबाबत सांग. तुझ्या घरी ड्रग्जचं पॅकेट कोण पोहोचवायचं?

युरोपवरून परतल्यानंतर सुशांत तुझ्या घरी थांबला होता. तिथून हिंदुजा हॉस्पिटल आणि पुन्हा तुझ्या घरी गेला होता. याबद्दल तू कुटुंबियांना का सांगितलं नाहीस. मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्जचा पुरवठा तुझ्या घरी केला आहे, असं खूप वेळा झालं आहे. तू याला परवानगी का दिली?

सप्टेंबर 2019 आणि नोव्हेंबर 2019 मध्ये जेव्हा तू सुशांतसह वॉटर स्टोन क्लबमध्ये होती. तेव्हा तिथं ड्रग्जची डिलीव्हरी झाली होती? डिलीव्हरी किती किमतीची होती आणि कुणी केली होती? सुशांत आपल्या कारमध्ये JOINTS ठेवायचा हे खरं आहे का? तूही तुझ्याकडे JOINTS ठेवायचीस का? याबाबत विचारणा केली. सुशांत आणि त्याच्या मित्रांच्या WEED, BUD आणि HASH च्या वापराबाबत सविस्तर माहिती दे.

जया शाहसह तुझे काही चॅट्स आहेत, तुला तिच्याबाबत काही माहिती आहे का? तुम्हा दोघांमध्ये BUD बाबत बोलणं झालं होतं? जया शाहचा ई-मेल आयडी, कमर्शियल शॉपिंग वेबसाइटबाबत माहिती दे. तुझे एकूण किती क अकाऊंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ईमेल आयडी आहेत? सुशांतसाठी तू कसे आणि कोणत्या प्रकारचे ड्रग्ज खरेदी करायची?

जेव्हा तू आणि सुशांत युरोप ट्रिपहून भारतात परतलात आणि विमानतळावर जी गाडी तुम्हाला पिक करण्यासाठी आली होती, त्यामध्ये WEED जॉइंट्स होते. ते घेतच तू आणि सुशांत घरापर्यंत पोहोचलात.याबाबत माहिती दे. युरोप ट्रिपनंतर जेव्हा सुशांत तुझ्या घरी थांबला होतो, तेव्हा सॅम्युअल मिरांडा तुझ्या घरी का येत होता?

शोविकला ड्रग्ज डिलर्सकडून फायदा व्हावा म्हणून तू त्याच्यासह ड्रग्जची खरेदी-विक्री सुरू केलीस का? सुशांत जेव्हा तुझ्या घरी थांबला होता त्यावेळी सूर्यदीप मल्होत्रादेखील तुझ्या घरी आला होता? करमजीतने जे बड मिरांडाला डिलीव्हर केलं होते, ते मिरांडाने शोविकला दिलं होतं? तुला याबाबत माहिती होती? शोविकला याची परवानगी दिली होती?

ड्रग्ज जी कोणती डिलीव्हरी झाली होती, त्याबाबत तुला माहिती होती. याबाबत काय सांगशील? नीरज सिंहला ओळखतेस का? तो सुशांतच्या घरी का यायचा? याची माहिती दे.

तुला सिद्धार्थ पिठानी, आयुष शर्मा, आनंदी धवन, रोहिणी अय्यर, श्रुती मोदी, रजत मेवाती, साहिल सागर, केषा आणि अशोक यांच्याबाबत काही माहिती आहे का? सुशांत आपल्या पार्टीमध्ये ड्रग्ज मागवायचा हे तुला माहित होतं का? कसं समजलं? ड्रग्जची खरेदी-विक्री गुन्हा आहे हे तुला माहिती नाही का? तपास यंत्रणेला तू तुला काही सांगायचं आहे का?