SRK तुमच्यात घमेंड खूप आहे? चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं 'ग्रेट' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 03:48 PM2021-03-31T15:48:15+5:302021-03-31T16:07:17+5:30

बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानने आज आपल्या लाखो चाहत्यांशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला. #AskSRk या हॅशटॅगने आपण मला प्रश्न विचारु शकता, असे शाहरुखने म्हटले होते. त्यानंतर, काही वेळातच शाहरुख ट्विटरवरुन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागला

बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानने आज आपल्या लाखो चाहत्यांशी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधला.

शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना मेसेज अलर्ट दिला होता. थोड्याच वेळात मी आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे.

#AskSRk या हॅशटॅगने आपण मला प्रश्न विचारु शकता, असे शाहरुखने म्हटले होते. त्यानंतर, काही वेळातच शाहरुख ट्विटरवरुन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागला.

ASKSRK या हॅशटॅगने शाहरुखला हजारो चाहत्यांनी प्रश्न विचारले, मात्र काही वेळातच त्यांनी आपला हा ट्रेंड बंद करण्यात असल्याचंही सांगितलं

दरम्यान, शाहरुखने अनेक चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. यावेली, अनेकांनी मेजशीर प्रश्नही विचारले.

शाहरुखच्या काही चाहत्यांनी त्याच्याबद्दलचे प्रेम चित्रकला आणि टॅटूच्या माध्यमातून व्यक्त केले.

शाहरुखला एका चाहत्याने, तु्म्हाला घमेंड खूप आहे, असं लोक म्हणतात, असा प्रश्न विचारला होता. त्यावर, शाहरुखने ग्रेट उत्तर दिलंय

नही यार मै इतना ग्रेट हूँ, मुझ मे बिलकूल इगो नही है... हाहा.. हाहा.. असे मेजशीर उत्तर शाहरुखने दिलंय.

शाहरुखने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन चाहत्यांशी संवाद साधला. त्यामुळे, ट्विटरवरील फॉलोअर्संनाही आनंद झाला.

पुढील आयपीएल मालिकेतील विजयासाठीही शाहरुखच्या केकेआर संघाला एका युजर्संने शुभेच्छा दिल्या. शाहरुखने त्याचेही आभार मानले आहेत.