महेश बाबूचं नव्हे तर 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारनेही केलंय लोकप्रिय मराठी अभिनेत्रीशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 05:23 PM2021-09-25T17:23:42+5:302021-09-25T17:59:35+5:30

Siddharth menon : सिध्दार्थ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने 'कल्यानम', 'सोलो', 'वेगम', 'वेलकम होम', 'रॉकस्टार' या मल्याळम चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची लव्हस्टोरी साऱ्यांनाच माहित आहे.

दाक्षिणात्य चित्रपट ‘वामसी’च्या सेटवर या दोघांची भेट झाली आणि या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.

चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर महेश-नम्रताने १० फेब्रुवारी २००५ मध्ये लग्न केलं. तेव्हापासून दाक्षिणात्य सुपरस्टार असण्यासोबतच महाराष्ट्राचा जावई अशी नवीन ओळखही त्याला मिळाली.

महेश बाबूने एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न केल्याचं साऱ्यांना ठावूक आहे. मात्र, त्याच्याव्यतिरिक्त आणखी एक दाक्षिणात्य अभिनेता आहे, ज्याने सुद्धा एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्नगाठ बांधली आहे.

साऊथचा सुपरस्टार सिद्धार्थ मेनन सगळ्यांनाच माहित आहे. याच सिद्धार्थने चक्क मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली आहे.

सिध्दार्थ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने 'कल्यानम', 'सोलो', 'वेगम', 'वेलकम होम', 'रॉकस्टार' या मल्याळम चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Thaikkudam bridge या नावाने त्याचा स्वतःचा म्युझिक बँडदेखील आहे. अनेक इव्हेंटमध्ये तो गाणी देखील सादर करताना दिसतो.

मूळचा केरळचा असलेल्या सिद्धार्थने अभिनेत्री तन्वी पालव हिच्यासोबत २०१९ मध्ये लग्न केलं आहे.

मराठमोळी अभिनेत्री तन्वी पालव हिने अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

वयाच्या १० व्या वर्षी दूरदर्शनवरील स्वराज या हिंदी मालिकेत तिने बालकलाकाराचे काम केले होते.

अभिनेत्री असण्यासोबतच तन्वी एक उत्तम कथ्थक नृत्यांगनादेखील आहे.

तन्वीने 'जावई विकत घेणे आहे', 'शुभंकरोती', 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Read in English