Shocking: तीन महिन्यांत दहा कलाकारांनी केली आत्महत्या; नाव वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 03:24 PM2020-08-07T15:24:45+5:302020-08-07T15:29:40+5:30

कोरोना व्हायरसच्या काळात मागील तीन महिन्यांत चित्रपट आणि टेलेव्हिजन क्षेत्राला धक्का देणाऱ्या घटना घडला. या लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड आणि टेलेव्हिजन क्षेत्रातील दहा स्टार्सनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला.

शुक्रवारी भोजपुरी इंडस्ट्रीतील अभिनेत्री अनुपमा पाठक हिच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले. तिनं 2 ऑगस्टला आत्महत्या केली. आर्थिक चणचणीमुळे तिनं ही आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं व्हिडीओ पोस्ट करून आपबीती सांगितली.

मुंबईत गुरुवारी टीव्ही अॅक्टर समीर शर्मानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कहानी घर-घर की, क्योंकी सास भी कभी बहू थी आणि ये रिश्ते यें प्यार के या गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी त्यानं ही आत्महत्या केली.

बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे आणि त्यानं नैराश्यमुळे तसे केले, असे सांगण्यात आले. आता या प्रकरणाचा CBI तपास करत आहेत.

सुशांतच्या आत्महत्येपूर्वी 8 जूनला त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूनं सर्वांना धक्का दिला. तिनं 14 व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

'क्राइम पेट्रोल', 'लाल इश्क' आणि 'मेरी दुर्गा' या मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहता हिनं 25 जूनला रात्री इंदूर येथील घरात गळफास घेतला.

'आदत से मजबूर' या मालिकेतील 32 वर्षीय अभिनेता मनमीत ग्रेवालनं 15 मे रोजी नवी मुंबईतील घरात आत्महत्या केली.

कन्नड अभिनेत्री आणि टीव्ही अँकर चांदना व्हीके हीनंही आत्महत्या केली. बॉयफ्रेंडनं लग्नास नकार दिल्यानं तिनं ही आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी तिनं एक व्हिडीओ तयार केला होता.

चेन्नईत तमीळ अभिनेता श्रीधर आणि त्याची बहिण जया कल्याणी यांनी आत्महत्या केली. 6 जूनला त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर आले.

कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेता सुशील गोवडा यानं 8 जुलैला आत्महत्या केली.

Read in English