८ जून रोजी सुशांतचं घर सोडण्याआधी नेमकं काय झालं होतं? रियाने दिली त्या दिवसाची डिटेल्ड माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 11:20 AM2020-08-28T11:20:21+5:302020-08-28T11:36:18+5:30

तिने ८ जून रोजी काय घडलं याची डिटेल माहिती दिली आहे. याच दिवशी रिया सुशांतचं घर सोडून गेली होती. या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर रिया स्पष्टपणे बोलली.

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रिया चक्रवर्तीने आपली बाजू मांडत तिच्यावर लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या आरोपांचं खंडनही केलं आहे. तसेच वेगवेगळ्या रहस्यमय गोष्टींचे खुलासेही केले आहेत. यात तिने ८ जून रोजी काय घडलं याची डिटेल माहिती दिली आहे. याच दिवशी रिया सुशांतचं घर सोडून गेली होती. या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर रिया स्पष्टपणे बोलली.

रियाने सांगितले की, '८ जून रोजी माझं एक थेरपी सेशन बुक होतं. डॉक्टर सुजेन वॉकर यांच्यासोबत. ते सकाळी ११.३० वाजता येणार होते. यातून हे स्पष्ट होतं की ८ जूनला सुशांतचं घर सोडून जाण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. मी माझ्या घरी हे थेरपी सेशन करू शकत नव्हते. माझी अजिबात इच्छा नव्हती की, मला माझ्या परिवाराने अशा स्थितीत बघावं. कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना असं बघू शकणार नाहीत'.

'त्यामुळे ८ जूनला जेव्हा माझं थेरपी सेशन होतं, तेव्हा मी सुशांतला हे सांगितलं होतं. तर मला नाही म्हणाला. तो म्हणाला की, आज थेरपी सेशन इथे करू नकोस. तू तुझ्या घरी जा. तर मी त्याला म्हणाले की, मला थेरपी सेशन करून जाऊ दे. तरी तो नाही म्हणाला. त्याने मला थेरपी सेशनआधीच जाण्यास सांगितले होते. तो म्हणाला होता की, त्याची बहीण येत आहे. तिचा फोन आला होता'.

'जून महिन्यात तो त्याच्या बहिणींसोबत आणि वडिलांसोबत सतत फोनवर बोलत होता. त्यांना सांगत होता की, चो कूर्गमध्ये शिफ्ट होण्याचा प्लॅन करत आहे. तर तुमच्यापैकी माझ्यासोबत कोण येईल. मला कोण मदत करेल. पण याचं कुणीही उत्तर दिलं नाही की, ते येणार की नाही'.

'फायनली ८ तारखेला तो मला म्हणाला की, तू तुझ्या घरी जाच. तर मी त्याला बोलली की, मी जाते पण एक अट आहे. ती म्हणजे तुझी बहीण मुंबईत राहते, गोरेगावमध्ये, मीतू जी, त्यांना बोलव. त्या आल्या की मी जाते'.

'मी त्याला म्हणाले होते की, आता १२ वाजले आहेत. मीतू जी किती वाजता येतील? तेव्हाच मी जाईन. त्या बिल्डींगखाली असतील तेव्हा मी जाणार. तर तो म्हणाला की, नाही तुला ती येण्याआधीच जावं लागेल'.

हा होता रियाने सांगितलेला सुशांतच्या घरी घडलेला ८ जून रोजीचा घटनाक्रम. सुशांतच्या घरातून निघाल्यावर काय झालं हेही रियाने सांगितले. तिने महेश भट्ट यांच्यासोबतच्या चॅटींगचं स्पष्टीकरणही दिलं.

रियाने सांगितले की, जेव्हा सुशांतने तिला जाण्यास सांगितले तेव्हा ती पूर्णपणे तुटली होते. तिला वाटलं की, ज्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य ठीक नाही त्या व्यक्तीसोबत ती एक ते दीड वर्ष राहिली. आता ती स्वत: अडचणीतून जात असताना तो तिला घरातून जाण्यास सांगत आहे.

नंतर रिया तिच्या घरी जाण्यासाठी निघाली. तेव्हा तिने महेश भट्ट यांना सुशांतच्या घरून निघाल्याचं सांगितलं. तिने सांगितले की, तिला काहीच समजत नव्हतं. ती पूर्णपणे धक्क्यात होती. महेश भट्ट तिच्यासाठी फादर फिगर होते. त्यामुळे त्यांच्यासोबत बोलणं तिला योग्य वाटलं.

रिया म्हणाली की, महेश भट्ट माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांची मुलगी माझ्या वयाची आहे. पण लोकांनी मला त्यांची गर्लफ्रेन्ड बनवलं. याचं मला फार वाईट वाटलंय.

Read in English