SEE PICS : रश्मिका मंदाना ठरली भारताची ‘नॅशनल क्रश’, कोण आहे ही सुंदर बाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 10:54 AM2020-11-23T10:54:52+5:302020-11-23T11:07:30+5:30

आलिया, दीपिका नाही तर साऊथची एक अभिनेत्री ‘नॅशनल क्रश’ ठरली आहे. हिचे नाव रश्मिका मंदाना.

आलिया, दीपिका नाही तर साऊथची एक अभिनेत्री ‘नॅशनल क्रश’ ठरली आहे. हिचे नाव रश्मिका मंदाना.

गुगल या सर्च इंजिनने रश्मिकाला ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ म्हटले आहे.

गुगलवर ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ सर्च केल्यास रश्मिका मंदानाचे नाव समोर येते.

रश्मिका साऊथ इंडिस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. याआधी ती ‘कर्नाटक क्रश’ म्हणून ओळखली जायची. पण आता तिची लोकप्रियता राष्ट्रीय स्तरावर पोहोचलीये.

गुगलवर रश्मिका ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ ठरताच तिचे फॅन्स आनंदाने बेभान झाले आहेत.

सोशल मीडियावर #NationalCrushRashmika ट्रेंड करतोय. चाहते रश्मिकावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

रश्मिका मंदानाने कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

2016 साली प्रदर्शित झालेला ‘किरिक पार्टी’ हा तिचा पहिला सिनेमा. रश्मिकाचा पहिलाच सिनेमा सुपरहिट झाला.

यानंतर 2017 साली चमक व अंजनिपुत्रा अशा हिट सिनेमात ती झळकली.

सलग हिट सिनेमे दिल्यानंतर तिने तेलगू इंडस्ट्रीत पदार्पण केले आणि चाहत्यांची ती आवडती अभिनेत्री बनली.

विजय देवरकोंडा स्टारर ‘गीता गोविंदम’ या चित्रपटातील रश्मिकाच्या अदांनी चाहत्यांना जणू वेड लावले.

लवकरच रश्मिका अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या सिनेमात दिसणार आहे.

याशिवाय ‘ कार्ति सुल्तान’ हा तामिळ सिनेमा आणि ‘पोगारू’ या कन्नड सिनेमातही ती झळकणार आहे.

आत्तापर्यंत रश्मिका तिच्या स्टाईलमुळे चर्चेत होती. पण आता सुंदर चेहरा, मनमोहक हास्य, बोलके डोळे यामुळे ती ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ बनली आहे.

रश्मिका सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.

2017 साली बँगलोर टाईम्सच्या 30 ‘मोस्ट डिझायरेबल वुमन’च्या यातील रश्मिका पहिल्या स्थानावर होती.

म्हणायला रश्मिका नवखी आहे. पण दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील अनेक बड्या बड्या हिरोईन्सला तिने मात दिली आहे.

बॉलिवूडमध्येही दीपिका, आलियासारख्या अभिनेत्रींना मात देत ती ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया 2020’ ठरली आहे.