त्याने मला जनावरासारखे मारले...; लग्नानंतर 14 दिवसांतच पूनम पांडेने घेतला पतीला सोडण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 13:00 IST2020-09-24T12:44:11+5:302020-09-24T13:00:06+5:30
14 दिवसांपूर्वीच पूनमने लग्न केले आणि आता हे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे.

बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 14 दिवसांपूर्वीच पूनमने लग्न केले आणि आता हे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे.

हनीमूनला गोव्यात असताना पतीने सॅम बॉम्बे याने मारहाण केल्याचा आरोप करत पूनमने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर गोवा पोलिसांनी सॅमला अटक केली. अर्थात दुस-याच दिवशी तो जामिनावर बाहेर आला.

मारहाणीनंतर पूनमने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हे नाते जपण्याचा खूप प्रयत्न केला. पण आता मला सॅमकडे परत जायचे नाही, असे पूनमने म्हटले आहे.

टाईम्स आॅफ इंडियाशी संवाद साधताना पूनमने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याने माझा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. आता मी मरणार, असे त्यावेळी मला वाटले होते, असे पूनम म्हणाली.

त्याने चेह-यावर मारले, माझे केस ओढले. माझे डोके बेडच्या कॉर्नरवर आपटले. कसाबसा मी माझा जीव वाचवला आणि पळाले. हॉटेल स्टाफने पोलिसांना बोलवले आणि ते त्याला घेऊन गेले. यानंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली, असे पूनमने सांगितले.

मी व सॅम तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. या तीन वर्षांत त्याने मला अनेकदा मारहाण करत हॉस्पीटलमध्ये जाण्यास भाग पाडले. तो खूप जास्त पजेसिव्ह आहे, असेही तिने सांगितले.

यावेळी मी त्याच्याकडे परत जाणार नाही. ज्याने तुम्हाला जनावरासारखे मारले, त्याच्याकडे परत जाणे योग्य निर्णय असूच शकत नाही, असे ती म्हणाली.

याच महिन्यात पूनम पांडे आपला बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाचे फोटो शेअर करुन पूनमने लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती.

गोव्याला हनिमूनला जाण्यापूवीर्चेही फोटो तिने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते.

















