बाबो..! प्लास्टिक सर्जरी या अभिनेत्रींच्या आली अंगाशी, एकीचा तर चेहराच झाला कुरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:31 PM2020-08-25T12:31:47+5:302020-08-25T12:34:46+5:30

सिनेमांपेक्षा प्लास्टिक सर्जरीमुळे चर्चेत आल्या या अभिनेत्री, एकीचा तर चेहरा झाला कुरूप

सिनेइंडस्ट्रीत सुंदर दिसण्यासाठी बऱ्याचदा प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतला जातो. अशा कित्येक अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरीने आणखीन सुंदर झाल्या आहेत. तर काही अभिनेत्रींना सर्जरी महागात पडली आहे. मेकओव्हरनंतरचा अभिनेत्रींचा लूक चाहत्यांना भावला नाही आणि त्यांनी या अभिनेत्रींना ट्रोल केले. जाणून घेऊयात कोणत्या अभिनेत्रींना प्लास्टिक सर्जरीमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

राखी सावंतने करियरची सुरूवात चित्रपट अग्निचक्रमधून केली. स्वतःला आणखीन सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी राखीने सर्जरीचा आधार घेतला. आधी तिचे ओठ खूप पातळ होते. त्याला मोठे बनवण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केली. त्यानंतर राखीने बऱ्याच सर्जरी केल्या. त्यामुळे ट्रोलर्सने तिला प्लास्टिकचे दुकान म्हटले आहे. सोशल मीडियावर आजही लोक तिला ट्रोल करतात. राखीने प्लास्टिक सर्जरी केल्याचे मान्य केले आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी केलेली प्लास्टिक सर्जरी इंस्टाग्राम स्टार सहर तबरला चांगलीच महागात पडली आहे. 2017 साली जवळपास पन्नास सर्जरी अँजेलिना जोलीसारखे दिसण्यासाठी केल्या होत्या. सहरने तेव्हा सांगितले की, तिने तिचे वजन 40 किलोच्या वर येऊ दिले नाही पण अँजेलिनासारखे बनण्याच्या नादात तिचा चेहराच कुरूप झाला.

श्रुती हासन दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने नाकाचीदेखील सर्जरी केली आहे. तिने 'वारनम आयिरम' (2008), 'पृथ्वी' (2010), 'उद्यान' (2011), 'येननामो येधो' (2014) या चित्रपटांसह बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. श्रुतीनेदेखील सर्जरी केल्याची कबूली दिली आहे.

बिग बॉस 13मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री कोएना मित्राने आपल्या नाकाची सर्जरी केली होती पण चांगले दिसण्याऐवजी तिचा चेहरा बिघडला. त्यानंतर तिला चित्रपट मिळणं देखील कठीण झाले. असे म्हटले जाते की प्लास्टिक सर्जरीमुळे तिला काम मिळेनासे झाले आणि जवळपास सहा महिन्यांपर्यंत तिला घरीच बसावे लागले होते. कोयना प्लास्टिक सर्जरीला जीवनातील खूप मोठी चूक मानते. प्लास्टिर सर्जरीची खंत तिने बिग बॉसच्या घरात व्यक्त केली होती.