आर्यन खानला ताब्यात घेणाऱ्या समीर वानखेडेंचं क्रांती रेडकरसोबत आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 02:51 PM2021-10-03T14:51:30+5:302021-10-03T14:58:31+5:30

Sameer wankhede: समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत.

मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतलं आहे. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाचा आर्यन खानचादेखील समावेश आहे.

एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून शाहरुख खानच्या मुलालादेखील त्यांनी ताब्यात घेतलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर समीर वानखेडे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले तेव्हा वानखेडेंनीच काही कलाकारांवर कारवाई केली होती.

सुशांत सिंह राजपूतनंतर समीर वानखेडे यांनी क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर कारवाई केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

समीर वानखेडेंचा कलाविश्वाशीदेखील अत्यंत जवळचा संबंध असल्याचं फार कमी जणांना माहित आहे.

समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती आहेत.

२०१७ मध्ये क्रांती आणि समीर यांचं लग्न झालं.

समीर आणि क्रांती या दाम्पत्याला जुळ्या मुली आहेत.

विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींच्या घरावर समीर वानखेडे यांनी धाडी टाकल्या आहेत.