महाठगासोबत वादग्रस्त नातं, सलमानसोबत जवळीक; मोठी आहे Jacqueline Fernandez च्या अफेअरची लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 11:17 AM2022-01-15T11:17:47+5:302022-01-15T11:23:52+5:30

Jacqueline Fernandez Affair List : असाही दावा केला जात आहे की, जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, जॅकलिनने हे नाकारलं आहे. पण जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो लीक झाल्यामुळे त्यांचं नातं होतं असं तरी दिसतंय.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. महाठग मनी लॉंड्रींग केसचा आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबतची जवळीक यामुळे जॅकलिन अडचणीत आली आहे. आता तिला सतत चौकशीसाठी ईडीच्या ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत आहे.

जॅकलिन फर्नांडिसवर सुकेशकडून महागडे गिफ्ट घेण्याचा आरोप आहे. असाही दावा केला जात आहे की, जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, जॅकलिनने हे नाकारलं आहे. पण जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो लीक झाल्यामुळे त्यांचं नातं होतं असं तरी दिसतंय.

जॅकलिन आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. ज्यात दोघेही रोमॅंटिक, किसींग पोज देताना दिसत आहेत. जॅकलिनला सुकेश किस करताना दिसत आहे, यावरून दोघांच्या नात्याचा अंदाज कुणीही बांधू शकतं. जॅकलिनला यावरून ट्रोलही केलं जात आहे. हे पहिल्यांदाच नाही की, जॅकलिनची लव्ह लाइफ चर्चेत आहे. तिची अफेअर्सची लिस्ट मोठी आहे.

जॅकलिनच्या लव्ह लिस्टमध्ये सर्वात वर आहे प्रिन्स ऑफ बहरीन. शेख हसन बिन रशिद अल खलीफा आणि जॅकलिन यांचं अफेअर असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. आपल्या बॉलिवूडच्या करिअरच्या सुरूवातीला जॅकलिन आणि प्रिन्सच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

जॅकलिनचं नंतर दिग्दर्शक साजिद खानसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही सीरिअस रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. अनेक वर्ष ते सोबत होते. अनेक इव्हेंट्समध्ये दोघे सोबत दिसत होते. मात्र, साजिदच्या पझेसिव्ह वागण्यामुळे दोघांचं ब्रेकअप झालं.

सलमान खान आणि जॅकलिनने अनेक सिनेमात एकत्र काम केलं. दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. सलमान खानच्या पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान जॅकलिन सलमान आणि त्याच्या परिवारासोबत राहिली होती. जॅकलिन आणि सलमानच्या नात्याची नेहमीच चर्चा होते.

जॅकलिनने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अ जेंटलमन सिनेमात काम केलं होतं. यादरम्यान दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. त्यावेळी सिद्धार्थ आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होता.

जॅकलिनच्या अफेअरची लिस्ट मोठी आहे. नेहमीच या नात्यांची चर्चाही होते. पण जॅकलिनने कधीही जाहीरपणे या अफेअरबाबत काहीही सांगितलं नाही. ती केवळ तिच्या नात्यांना मैत्रीचं नाव देत होती.