अभिनेता विष्णू विशालवर भाळली ज्वाला गुट्टा, पाहा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:25 AM2021-04-14T09:25:00+5:302021-04-14T09:30:03+5:30

भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (jwala gutta) आणि अभिनेता विष्णू विशाल (vishnu vishal) लवकर लग्नबेडीत अडकणार आहेत.

भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अभिनेता विष्णू विशाल हे लव्हबर्ड्स लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. अभिनेता विष्णू विशालसोबत ज्चाला लग्नगाठ बांधणार आहे.

अभिनेता होण्याआधी विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता. कदाचित खेळ हाच प्रेमातील दुवा ठरला आणि ज्वाला व विष्णु एकमेकांच्या जवळ आलेत.

खूप दिवसांपासून ज्वाला व विष्णू दोघे प्रेमात होते. गेल्यावर्षी म्हणजेच ज्वालाच्या 37 व्या वाढदिवशी या दोघांनी साखरपुडा केला होता. आता ते 22 एप्रिलला लग्न करणार असल्याची माहिती ज्वालाने स्वत: सोशल मीडियावरून दिली आहे.

ज्वाला गुट्टा सध्या बॅडमिंटन अकॅडमी चालवते. तिने कॉमनवेल्थ खेळामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप, तसेच दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यामध्ये पदकं मिळविली आहेत.

विष्णू विशालला तर दक्षिण चित्रपटांतील सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. पण तो एक क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो.

विष्णुने आर, अश्विन आणि बद्रीनाथसोबत क्रिकेट खेळले आहे. त्याने तामिळनाडूसाठी अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. त्यावेळी तो रमेश कुडावला नावाने ओळखला जात होता. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने क्रिकेटला रामराम केला.

क्रिकेट सोडल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विष्णू असे नवे नामकरण केले. आता तो प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.

ज्वाला गुट्टाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदसोबत लग्न केले होते. मात्र 2011 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.

विष्णूचे सुद्धा हे दुसरे लग्न आहे. याआधी त्यानं रजनी नटराजन सोबत लग्न केले होते. मात्र नंतर ते विभक्त झाले.

टॅग्स :TollywoodTollywood