जाळीदार कपड्यांमध्ये कंगनानं दाखवली धाकड स्टाईल, किलर लुक्समुळे चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 11:57 PM2022-05-19T23:57:45+5:302022-05-19T23:59:47+5:30

Kangana Ranaut: कंगना राणौतचा धाकड हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही तास आधी कंगनाने सौशल मिडियावर आपल्या धाकड स्टाइलमधील काही फोटो शेअर केले आहेत. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाहा कंगनाच्या या नव्या फोटो सेशनमधील फोटो.

कंगना राणौतचा धाकड हा चित्रपट २० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी काही तास आधी कंगनाने सौशल मिडियावर आपल्या धाकड स्टाइलमधील काही फोटो शेअर केले आहेत. ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पाहा कंगनाच्या या नव्या फोटो सेशनमधील फोटो.

या फोटोंमध्ये कंगना राणौत ब्लॅक कलरच्या जाळीदार ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेस पूर्णपणे ब्लॅक आहे. त्यावर फ्लॉवर प्रिंटचं वर्क करण्यात आलं आहे.

फोटोंमध्ये कंगनाने वरून जाळीदार ड्रेस घातलेला दिसत आहे. तर त्याखालील बाजूला ड्रेसमध्ये ट्रान्सपरन्ट कपड्यांचा वापर करण्यात आला आहे.

अभिनेत्रीच्या या ड्रेसचा गळा पुढील बाजूने खूप डीप आहे. तो तिच्या ड्रेसला बोल्ड लूक देत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी कंगनाने हेअरस्टाईलही केली आहे. तसेच लाइट मेकअपसोबत किलर लुक देताना ती दिसत आहे.

या लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती कधी उभी राहून कॅमेऱ्याकडे पाहून पोझ देताना दिसत आहे. तर काही फोटोमध्ये ती बसलेली दिसत आहे.

हे फोटो कंगना राणौतने आपल्या अधिकृत इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन दिली आहे. त्यात ती म्हणते प्रीमियर रेडी इन धाकड स्टाइल.