IN PICS: बॉलिवूड सेलिब्रिटींचं पहिलं प्रेम माहितीय का? पाहा कोण कोण आहे यादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:18 PM2020-07-08T14:18:30+5:302020-07-08T14:28:52+5:30

या सेलिब्रिटींचे पहिले प्रेम पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

दीपिका पादुकोण - दीपिका पादुकोण आता रणवीर सिंगची झालीय. पण रणवीरसोबत लग्न होण्याआधी तिचे नाव अनेकांसोबत जोडले गेले. मात्र निहार पांड्यासोबतच्या तिच्या अफेअरची सर्वाधिक चर्चा झाली होती. स्ट्रगल काळात दीपिका निहारला डेट करत होती. त्याअर्थाने निहार हे दीपिकाचे पहिले प्रेम होते. 2007 मध्ये दीपिकाने ‘ओम शांती ओम’ मधून डेब्यू केला आणि यानंतर तिचे व निहारचे ब्रेकअप झाले.

ऐश्वर्या राय - ऐश्वर्या रायचे पहिले प्रेम म्हणजे सलमान खान असेच अनेकांना वाटते. मात्र सलमानआधी ऐश्वर्या राजीव मुलचंदानीला डेट करत होती. बॉलिवूडमध्ये यश मिळाल्यावर ऐश्वर्याच्या आयुष्यातून राजीव गेला. पुढे सलमान खान तिच्या आयुष्यात आला. यानंतरची सगळी स्टोरी तुम्हाला ठाऊक आहेच.

अनुष्का शर्मा- अनुष्का शर्माने क्रिकेटपटू विराट कोहलीला जोडीदार म्हणून निवडले. पण बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनुष्का जोहब युसूफसोबत रिलेशनशिपमध्ये होती. जोहब हा सुद्धा मॉडेल होता. पण अनुष्का मॉडेलची अभिनेत्री झाली आणि जोहबसोबत तिने ब्रेकअप केले.

प्रियंका चोप्रा - प्रियंका चोप्राने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत संसार थाटला. मात्र एकेकाळी हीच प्रियंका मॉडेल असीम मर्चंटसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र प्रियंकाने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर दोघांमध्ये दुरावा आला.

आलिया भट - आलिया भट सध्या रणबीर कपूरच्या प्रेमात वेड झालीय. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधी ती अली दादरकरला डेट करत होती. तो तिचा बालपणीचा मित्र होता. पुढे आलिया बॉलिवूडमध्ये आली आणि अलीसोबतची तिची जोडी कायमची तुटली.

अर्जुन कपूर - अर्जुन कपूर सध्या मलायका अरोराला डेट करतोय. पण सिनेमात येण्याआधी अर्जुन सलमान खानची बहीण अर्पिता खानला डेट करत होता. आता हाच अर्जुन अर्पिताच्या एक्स-वहिनीला म्हणजे मलायकाला डेट करतोय.

जॅकलिन फर्नांडिस - मिस युनिव्हर्स श्रीलंका राहिलेली जॅकलिन सिनेमात येण्याआधी टीव्ही रिपोर्टर म्हणून काम करत होती. फार कमी लोकांना माहीत आहे की, जॅकलिनचा पहिला बॉयफ्रेन्ड एक प्रिन्स होता. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात ती अरबमधील बहरीनचा प्रिन्स हसन बिन राशिद अली खलीफा याला डेट करत होती. या दोघांची भेट एका कॉमन फ्रेन्डच्या पार्टीमध्ये झाली होती. पुढे जॅकलिनला ‘हाऊसफुल’ सिनेमा मिळाल्यावर दोघे वेगळे झाले.

सलमान खान - बॉलिवूडचा दबंग खान सलमान चित्रपटांव्यतिरिक्त कित्येक अभिनेत्रींसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव बॉलिवूडच्या ब-याच मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली त्याचे पहिले प्रेम होते, असे म्हटले जाते. मात्र सोमी पहिलं प्रेम नसून अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी शाहीन जाफ्री त्याचे पहिले प्रेम होते. सलमान खान १९ वषार्चा होता. त्यावेळी तो त्याच्या लाल रंगाच्या स्पोर्ट्स कारमध्ये तासनतास मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेज बाहेर कोणाचीतरी वाट पाहत उभा असायचा. ही मुलगी म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी शाहीन जाफ्री.

रणबीर कपूर - रणबीर कपूर याच्या एक्स-गर्लफे्रन्डची यादी बरीच मोठी आहे. यापैकी दीपिका पादुकोण व कतरिना कैफबद्दल तुम्हाला ठाऊक आहे. पण अगदी सुरुवातीला रणबीर अवंतिका मलिकसोबत रिलेशनशिपमध्ये होता. कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. अवंतिकाने पुढे आमिर खानचा भाचा इमरान खानसोबत लग्न केले. पण आता अवंतिका इमरानपासूनही वेगळी झाली आहे.