राजमहालापेक्षा कमी नाही बिग बींचा 'जलसा'; पाहा घराचे Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:26 AM2021-09-22T10:26:31+5:302021-09-22T10:36:02+5:30

Jalsa inside photos: जलसा हा बंगला जवळपास १०० कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत.

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. उत्तम अभिनयाच्या जोरावर बिग बींनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (All Photos: amitabh bachchan/ propertyguru.in instagram)

केवळ देशातच नाही तर सातासमुद्रापार विदेशातही बिग बींचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

बिग बींना भेटण्यासाठी दररोज असंख्य चाहते त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करतात.

मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांचे तीन मोठे आलिशान बंगले आहेत. जलसा, प्रतीक्षा आणि जनक अशी त्यांच्या बंगल्याची नावं आहेत.

तीनही बंगल्यांमध्ये बिग बींना जलसा जास्त प्रिय असून ते संपूर्ण कुटुंबासह इथेच राहतात.

अमिताभ बच्चन यांना अभिनयासोबतच लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी खास स्टडी रुम तयार करुन घेतला आहे.

या बंगल्यातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा विचारपूर्वक डिझाइन केला आहे.

बिग बींच्या जलसामधील लिव्हिंग एरिया. हा बंगला जवळपास १०० कोटी रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत.

एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणेच बिग बींचं बेडरुम आहे.

बिग बींना कलेची विशेष आवड असल्यामुळे त्यांच्या घरात अनेक ठिकाणी फोटोफ्रेम, पेंटिंग्स लावल्याचं पाहायला मिळतं.

घरातील बाथरुमदेखील एखाद्या हॉटेलप्रमाणेच डिझाइन केलं आहे.

Read in English