आशा भोसलेंची नात देतीये बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर; पाहा तिचे Glamorous Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 10:25 AM2021-10-17T10:25:37+5:302021-10-17T10:34:47+5:30

Zanai bhosle : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या आगामी चित्रपटातून जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते असं म्हटलं जात आहे.

आपल्या सुमधूर आवाजाने जगभरातील कानसेनांना तृप्त करणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणजे आशा भोसले(Asha Bhosle). गेल्या कित्येक वर्षांपासून आशा भोसले त्यांच्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. ( फोटो सौजन्य: जनाई भोसले इन्स्टाग्राम पेज)

कायम आपल्या आवाजामुळे चर्चेत येणाऱ्या आशा भोसले गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नातीमुळे म्हणजेच जनाईमुळे (Zanai) चर्चेत येत आहेत.

आशा भोसले यांच्या नातीचं नाव जनाई असून ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या आगामी चित्रपटातून जनाई बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते असं म्हटलं जात आहे.

जनाई संगीत क्षेत्रात फारसं नाव कमावू शकली नाही. मात्र, तरीदेखील सोशल मीडियावर ती कायमच चर्चेत असते.

जनाई इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असून ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

जनाईने तिच्या इन्स्टाग्रामवर आशा भोसलेंसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, आशा भोसले यांनी संजय लीला भन्साली यांची भेट घेतली असून जनाईच्या डेब्यूबद्दल त्यांनी चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे.

जनाईने देशातील पहिल्या ट्रान्सजेंडरसाठी गाणं गायलं होतं. त्यामुळे ती विशेष चर्चेत आली होती.

जनाईने संगीतासोबतच शबाना आझमी यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.

जनाई सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो शेअर करत असते.

जनाईला फिरण्याची प्रचंड आवड असून कोणत्याही नव्या ठिकाणाला भेट दिल्यावर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

जनाईच्या चेहऱ्यावरील निरागस भाव अनेकांचं लक्ष वेधून घेतात.

Read in English