मंदाना करीमीने निर्मात्यावर लावला शोषणाचा आरोप, म्हणाली - 'मी चेंज करत होते आणि तो आत आला....'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 12:58 PM2020-11-23T12:58:06+5:302020-11-23T13:09:08+5:30

मंदानानुसार, सुरूवातीपासूनच या क्रू सोबत काम करण्यात मला अडचण होती. निर्माता महेंद्र धारीवाल जुन्या विचारांचा माणून आहे. जो सेटवर पुरूष केंद्रीत आणि अंहकारग्रस्त जागा बनवतो.

बिग बॉस सीझन ९ ची स्पर्धक राहिलेली अभिनेत्री आणि मॉडल मंदाना करिमीने तिचा सिनेमा 'कोका कोला'च्या निर्मात्यावर शोषण आणि छेडछाड केल्याचा आरोप लावला आहे. मंदानाने आरोप लावला की, शूटींगच्या शेवटच्या दिवशी निर्मात्याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं. तर निर्माता महेंद्र धारीवालने हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. उलट तिचं वागणं अनप्रोफेशनल असल्याचा आरोप त्याने लावला आहे.

एका मुलाखतीत मंदाना म्हणाली की, दिवाळीच्या एक दिवसआधी झालेल्या या घटनेने तिला धक्का बसला. कोका कोला सिनेमावर आम्ही गेल्या वर्षभरापासून काम करत आहोत. आणि हे एक असं काम होतं ज्याची टीम प्रोफेशनल नाही हे माहीत असतानाही तुम्ही काम करता.

मंदानानुसार, सुरूवातीपासूनच या क्रू सोबत काम करण्यात मला अडचण होती. निर्माता महेंद्र धारीवाल जुन्या विचारांचा माणून आहे. जो सेटवर पुरूष केंद्रीत आणि अंहकारग्रस्त जागा बनवतो.

शूटींगचा शेवटचा दिवस होता आणि मी माझं संपवून जायच्या तयारीत होते. मला कुणालातरी भेटायला जायचं होतं. शूट संपण्यापूर्वी निर्मात्याने मला १ तास थांबण्यास सांगितलं. शूट संपताच मी चेंज करण्यासाठी व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले आणि स्पॉटबॉयला सांगितलं कुणाला आत येऊ देऊ नको.

मी कपडे बदलत असताना धारीवाल आत आला. मी त्याला बाहेर जाण्याची विनंती केली. पण तो गेला नाही आणि माझ्यावर रागावू लागला. तो म्हणाला तू जाऊ शकत नाही. मी तुला १ तास एक्स्ट्रा काम करण्यास सांगितलं. तुला हे करावं लागेल कारण मी निर्माता आहे. मी यासाठी तुला पैसे दिले आहेत.

मंदानानुसार, यानंतर निर्मात्याने मुलासोबत मिळून तिथे तमाशा केला. बरं झालं की, तिथे स्टायलिस्ट हितेंद्र उपस्थित होते आणि त्यांनी वाद वाढण्यापूर्वीच धारीवालला बाहेर काढलं.

तर दुसरीकडे मंदानाच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत धारीवाल म्हणाला की, आम्ही मंदानाला ७ लाख रूपयांमध्ये साइन केलं होतं. पण शूटींग सुरू झाल्यावर तिची नखरे सुरू झाले होते. जसे की, दिल्लीमध्ये शूटींग सुरू होतं आणि तिला एका दिवसासाठी परत यायचं होतं. तेव्हा तिने दोन लाख रूपयांची मागणी केली.

सिनेमाच्या शूटींगच्या शेवटच्या दिवसाबाबत तो म्हणाला की, तिची शिफ्ट सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत होतं. पण तिला ८ वाजताच जायचं होतं. तिला हे समजवायला गेलो की, शूटींगला आणखी उशीर करू शकत नाही. तिच्या मागे व्हॅनिटीमध्ये गेलो तर ती समजूनच घेत नव्हती आणि पॅकअप करू लागली होती.

धारीवालनुसार, मी तिच्या या वागण्याने नाराज झालो आणि ओरडलो. यावर मंदानाने माझा व्हिडीओ काढणं सुरू केलं. ती व्हॅनिटीमध्ये गेल्यावर १० ते १५ सेकंदात मी गेलो होतो. आणि आत जाण्याआधी मी दारही वाजवलं होतं. तिने मला आत येण्यास सांगितलं होतं. मी तिला एक्स्ट्रा काही मिनिटे देण्यास सांगितली पण तिने नकार दिला.