एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला, पाहा या अलिशान बंगल्याचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 06:00 IST2020-05-30T06:00:00+5:302020-05-30T06:00:02+5:30

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन खऱ्या जीवनातही शहेनशाह असून त्यासारखेच जीवन जगतात.

अमिताभ बच्चन जलसा या बंगल्यात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहात असून या बंगल्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचं नाव जलसा आहे आणि त्यांचे हे घर विलेपार्ले येथील जुहू येथे आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १०० कोटी ते १२० कोटी रुपये इतकी आहे.

अमिताभ बच्चन यांच्या रूमच्या भिंतीवर काही फोटो पाहायला मिळतात.

अमिताभ बच्चन यांच्या घरातील इंटेरिअरमध्ये वापरण्यात आलेले सामान प्रचंड महाग असून घराचे इंटेरिअर करताना प्रत्येकाच्या आवडीचा विचार करण्यात आला आहे.

जलसामध्ये अमिताभ बच्चन यांनी वेगळे मंदिर देखील बनवले आहे जिथे अनेक देवांच्या मूर्ती आहेत.

बिग बी अनेकवेळा घराच्या टेरेसमधून चाहत्यांना अभिवादन करतात. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप गर्दी करतात.

जलसामध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजे जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व नात आराध्यासोबत राहतात.

अमिताभ बच्चन यांचे घर एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे.

बिग बींना हिरवळ खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या घराबाहेर एक छोटंसं गार्डनदेखील आहे.

















