अब तक छप्पन ते सिम्बा...! हे आहेत बॉलिवूडचे गाजलेले ‘एन्काऊंटर स्पेशल’ सिनेमे

Published: July 10, 2020 04:52 PM2020-07-10T16:52:30+5:302020-07-10T17:35:48+5:30

कुख्यात गुंड विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आणि देशभर या एन्काऊंटरची चर्चा रंगली. यादरम्यान एन्काऊंटरवर आधारित बॉलिवूडच्या सिनेमांचीही चर्चा सुरु झाली. पाहा तर एन्काऊंटरवर आधारित सिनेमांची यादी

बाटला हाऊस - 2019 मध्ये रिलीज झालेला ‘बाटला हाऊस’ हा सिनेमा बाटला हाऊस एन्काऊंटरवर आधारित आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम लीड भूमिकेत आहे.

एन्काऊंटर- द किलींग - 2002 मध्ये रिलीज या सिनेमात नसीरूद्दीन शहा व तारा देशपांडे लीड रोलमध्ये होते. पोलिस इन्स्पेक्टरच्या अवतीभवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे.

शूटआऊट अ‍ॅट वडाला- या सिनेमात जॉन अब्राहमने मान्या सुर्वेची भूमिका साकारली आहे. मान्या स्वत:ची एक अंडरवर्ल्ड टीम बनवतो. चित्रपटाच्या शेवटी मात्र पोलिस मान्या सुर्वेचा खात्मा करतात.

सिम्बा - रोहित शेट्टीच्याच सिम्बा या सिनेमाची कथाही एन्काऊंटरवर आधारित आहे. यात रणवीर सिंग लीड भूमिकेत आहे. सिम्बाची मानलेली बहीण आकृतीचा रेप होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू होता. यानंतर सिम्बा आकृतीच्या दोषींना एन्काऊंटरमध्ये ठार करतो.

सिंघम - रोहित शेट्टीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘सिंघम’ हाही एन्काऊंटरवर आधारित आहे. अजय देवगणने यात एका प्रामाणिक पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारली आहे. हा बाजीराम सिंघम भ्रष्ट नेता जयकांत शिर्केचे एन्काऊंटर करताना यात दाखवले गेले होते.

गर्व- 2004 साली आलेल्या या सिनेमात सलमान खान लीडमध्ये होता. हाही एन्काऊंटरवर आधारित सिनेमा होता.

अब तक छप्पन - नाना पाटेकरचा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. यात नानाने एका प्रामाणिक पोलिस अधिका-याची भूमिका साकारलेली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English