पार्थ पवारांसाठी पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पुन्हा रंगेहात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 15:08 IST2019-04-28T15:07:41+5:302019-04-28T15:08:44+5:30
मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे

पार्थ पवारांसाठी पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पुन्हा रंगेहात पकडले
पनवेल: मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार करताना शेकापच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आलं आहे. सुकापूर इथं मतदारांना प्रत्येकी 200 रुपये वाटत असताना पनवेल निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शेकापच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले. पनवेल भरारी पथकाने शेकाप पदाधिकाऱ्यांकडून 200 रुपयांची 29 पाकिटंही जप्त केली आहेत. पैसे वाटण्याबाबत भरारी पथकाने सलग दुसऱ्या दिवशी शेकाप कार्यकर्त्यांवर कारवाई केली. या सर्व प्रकारावर आता मोठी टीका होत आहे.