विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 11:00 IST2024-05-19T10:59:14+5:302024-05-19T11:00:13+5:30
स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे.

विजयी षटकार ठाेकणार की भाकरी फिरणार?
राकेश जोशी -
गुरुग्राम : हरयाणातील लोकसभेच्या १० जागांपैकी गुरुग्राम ही जागा गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपच्या ताब्यात आहे. काँग्रेस आणि जेजेपी यांच्यातील ‘सेलिब्रिटी कार्ड’मुळे गुरुग्रामची लढत रंजक बनली आहे. त्यामुळे भाकरी फिरणार की विजयाचा षटकार ठोकला जाणार, याचीच उत्सुकता आहे. काँग्रेसतर्फे लढणारे चित्रपट अभिनेते राज बब्बर हे राव इंद्रजीत सिंह यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. जनता जननायक पक्षाचे (जेजेपी) राहुल यादव ऊर्फ फाजिलपुरिया यांनीही बाजी लावली आहे. स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
अहिरवालमधील पाणी योजनेसह अन्य विविध प्रकल्प अपुर्ण असल्याने नागरीकांची पाण्यासाठी वणवण कायम.
वाहतूक, जबर टोल वसुली कचरा, तुटलेले बसस्थानक, आरोग्य सेवेचा अभाव यासह नागरीकांना अद्यापही छोट्या-छोट्या मुलभूत सोयी सुविधासाठी झगडावे लागत आहे.
उत्कृष्ट दर्जाच्या शाळांची अद्यापही प्रतीक्षा असल्याने विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?
राव इंद्रजीत सिंह, भाजप (विजयी) - ८,८१,५४६
कॅ. अजय सिंह, काँग्रेस (पराभूत)- ४,९५,२९०