Video: आग्रा येथे पर्यटकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, Video व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:16 IST2023-07-18T15:16:05+5:302023-07-18T15:16:22+5:30

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Video: Gang attack on tourist in Agra; Brutally beaten with sticks, Video viral | Video: आग्रा येथे पर्यटकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, Video व्हायरल...

Video: आग्रा येथे पर्यटकावर टोळक्याचा हल्ला; लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण, Video व्हायरल...

आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ताजमहल पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात. पण, येथून एका पर्यटकाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नवी दिल्लीहून आग्रा येथे आलेल्या पर्यटकाचा काही लोकांनी पाठलाग केला आणि त्याला एका दुकानात गाठून बेदम मारहाण केली. पर्यटकाच्या गाडीचा हल्लेखोरांच्या गाडीला धक्का लागल्यामुळे मारहाण केल्याची माहिती आहे. 

ही घटना सोमवारी घडली असून त्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. अनेक ट्विटर युजर्स हा व्हिडिओ यूपी पोलिसांना टॅग करत असून, ताजगंज पोलिस स्टेशनला आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना आग्राच्या ताजगंज भागातील बसई चौकीची आहे. ही घटना मिठाईच्या दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

व्हिडिओमध्ये पर्यटक हात जोडून माफी मागताना दिसत आहे, पण 10-12 हल्लेखोर त्याच्यावर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण सुरुच ठेवतात. यावेळी दुकान मालकदेखील त्या हल्लेखोरांना थांबण्याची विनंती करताना दिसत आहे. पण, ते त्याचेही ऐकत नाहीत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि ट्विटरवरही याची माहिती दिली. 

Web Title: Video: Gang attack on tourist in Agra; Brutally beaten with sticks, Video viral