आमदार पत्नीला उमेदवार म्हणाला, घर साेडून जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:08 IST2024-04-01T10:07:53+5:302024-04-01T10:08:36+5:30

Lok Sabha Election 2024: एकाच घरातून दाेन पक्षांचा प्रचार चालणार नाही, असे सांगत बसप उमेदवार कंकर मुंजारे यांनी त्यांची आमदार पत्नी अनुभा यांना घर साेडण्यास सांगितले आहे. कंकर हे बालाघाट-शिवनी मतदारसंघातील उमेदवार आहेत. हे घर माझे आहे.

The candidate said to the MLA's wife, leave the house | आमदार पत्नीला उमेदवार म्हणाला, घर साेडून जा

आमदार पत्नीला उमेदवार म्हणाला, घर साेडून जा

बालाघाट - एकाच घरातून दाेन पक्षांचा प्रचार चालणार नाही, असे सांगत बसप उमेदवार कंकर मुंजारे यांनी त्यांची आमदार पत्नी अनुभा यांना घर साेडण्यास सांगितले आहे. कंकर हे बालाघाट-शिवनी मतदारसंघातील उमेदवार आहेत. हे घर माझे आहे. अनुभा यांनी १९ एप्रिलपर्यंत घर साेडावे, अन्यथा मीच घर साेडून निघून जाईन, असे कंकर यांनी सांगितले आहे. अनुभा या बालाघाट येथील काॅंग्रेसच्या आमदार आहेत. त्या काॅंग्रेस उमेदवार सम्राट सरसवार यांचा प्रचार करीत आहेत.

Web Title: The candidate said to the MLA's wife, leave the house