पिटबुलचा 11 वर्षीय मुलावर हल्ला, शरीरावर 32 ठिकाणी घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 10:25 AM2021-07-20T10:25:48+5:302021-07-20T10:27:37+5:30

Pitbull Dog Attack:अशाप्रकारचे कुत्रे पाळण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज असते.

rajasthan news, pitbull dog attack 11 year old child in jaipur | पिटबुलचा 11 वर्षीय मुलावर हल्ला, शरीरावर 32 ठिकाणी घेतला चावा

पिटबुलचा 11 वर्षीय मुलावर हल्ला, शरीरावर 32 ठिकाणी घेतला चावा

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी पिटबुलच्या हल्ल्यात कर्नाटकमधील व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

जयपूर-जयपूरममध्ये एका 11 वर्षीय मुलावर पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला करुन शरीरावर 32 ठिकाणी चावल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलाच्या चेहरा आणि डोक्यावर गंभीर जखमा झाल्या असून, त्याला जयपूरच्या सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर महानगर पालिकेने पिटबुलला आपल्या ताब्यात घेतले आहे. पिटबुल जातीचा कुत्रा अतिशय हिंस्त्र स्वभावाचा असतो. देशातील अनेक राज्यांमध्ये या कुत्र्याला पाळण्यास बंदी आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जयपूरमधील अजमेर रोडवरील हनुमान वाटिकामध्ये दुर्गेश हाडा यांचा बंगला घर आहे. जगदीश मीना नावाचा व्यक्ती त्यांच्या घरात बागकाम आणि वॉचमनची नोकरी करायचा. जगदीश आपल्या कुटुंबासह हाडा यांच्या बंगल्यातील गॅरेजमध्ये राहत होता. घटनेच्या दिवशी जगदीश यांचा 11 वर्षीय मुलगा हाडा यांच्याकडे असलेल्या पाळीव पिटबुलकडे गेला. काही वेळानंतर अचानक त्या मुलाचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला.

पिटबुलने कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडले
मुलाचा आवाज ऐकून जगदीश यांची पत्नी धावत गेली असता तिला धक्काच बसला. पिटबुलने त्या मुलाला आपल्या जबड्यात पकडले होते आणि तो मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावू लागला. आईने कसेबसे आपल्या मुलाला त्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात भरती केले.

घरमालकावर गुन्हा दाखल
पोलिसांनी घरमालक दुर्गेश हाडावर हलगर्जीपणा आणि जगदीश यांच्या कुटुंबाला शांत राहण्यासाठी धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. तसेच, महापालिकेच्या अॅनिमल शाखेने पिटबुलला आपल्या ताब्यात घेतले आहे. नियमानसार, अशाप्रकारचे कुत्रे पाळण्यासाठी रजिस्ट्रेशनची गरज असते. पण, हाडाकडे कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेन नव्हते. 

पिटबुलमुळे अनेकांचा जीव जातो
जयपुर नगर पालिकेतील अधिकारी अरुण वर्मा यांनी सांगितले की, या जातीच्या कुत्र्याला घरात पाळण्यास जयपूरमध्ये बंदी आहे. तसेच, देशातील अनेक राज्यांमध्येही याला पाळण्यास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले. तिकडे कर्नाटकमध्ये 12 मे 2021 रोजी पिटबुलने एका व्यक्तीचा जीव घेतला होता. तसेच, अमेरिकेत दरवर्षी पिटबुलच्या हल्ल्यात 50 जणांचा जीव जातो.

Web Title: rajasthan news, pitbull dog attack 11 year old child in jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.