Digvijaya Singh : "BJP आता BCP झालीय"; दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला, 'तो' फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 01:44 PM2024-04-09T13:44:30+5:302024-04-09T13:59:22+5:30

Lok Sabha Elections 2024 Digvijaya Singh And BJP : दिग्विजय सिंह यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Lok Sabha Elections 2024 madhya pradesh congress Digvijaya Singh shared photo said bjp has now become bcp | Digvijaya Singh : "BJP आता BCP झालीय"; दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला, 'तो' फोटो केला शेअर

Digvijaya Singh : "BJP आता BCP झालीय"; दिग्विजय सिंह यांचा खोचक टोला, 'तो' फोटो केला शेअर

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या 'X' या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला असून भारतीय जनता पक्ष आता काँग्रेसयुक्त झाल्याचं म्हटलं आहे. BJP आता BCP झाला आहे असा खोचक टोला लगावला आहे. आता भाजपानेही दिग्विजय सिंह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा सातत्याने माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावर हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसही आरोप करण्यात मागे हटत नाही. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एक फोटो शेअर करत भाजपावर निशाणा साधला आहे. या फोटोत मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्यासह मंत्री तुलसी सिलावट, काँग्रेसचे माजी आमदार अंतर सिंह दरबार आणि संजय शुक्ला दिसत आहेत.

यासोबतच इंदूरच्या आमदार मालिनी गौर सीएम मोहन यांच्या जवळ दिसत आहेत आणि त्यांच्या मागे सुदर्शन गुप्ता दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना दिग्विजय सिंह यांनी लिहिलं आहे की, "मध्य प्रदेश काँग्रेसमुक्त करण्याचा दावा करणारी भारतीय जनता पार्टी काँग्रेसयुक्त झाली आहे. BJP आता BCP म्हणजेच भारतीय काँग्रेस पक्ष बनत आहे."

दिग्विजय सिंह यांना जोरदार प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राजपाल सिंह सिसोदिया म्हणाले, काँग्रेसचे अनेक माजी आमदार, आमदार आणि मोठे नेते पक्ष सोडत आहेत ही काँग्रेससाठी शरमेची बाब आहे. त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला भोगावे लागतील.

काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये येण्यामागे दिग्विजय सिंह हेही एक मोठं कारण आहे. त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात मध्य प्रदेशला ज्या दुर्दशेला सामोरे जावे लागले त्याची किंमत काँग्रेस अजूनही चुकवत आहे. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह ज्या नेत्यांचा उल्लेख करत आहेत ते आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत असंही म्हटलं. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 madhya pradesh congress Digvijaya Singh shared photo said bjp has now become bcp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.