...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 07:40 AM2024-03-31T07:40:05+5:302024-03-31T07:40:56+5:30

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्लॅन बी लागू केला आहे.

Lok Sabha Election 2024: ...while ticket to other party leaders, chances of victory are important, BJP's plan B is ready for 370 seats | ...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार

...तर इतर पक्षाच्या नेत्यांना तिकीट, विजयाची शक्यता महत्त्वाची, भाजपचा ३७० जागांसाठी प्लॅन बी तयार

- संजय शर्मा
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्लॅन बी लागू केला आहे. प्लॅन बी म्हणजे तुमच्या पक्षात विजयी होऊ शकणारे नेते नसतील तर इतर पक्षांच्या नेत्यांना तिकीट द्या. त्यानुसार, काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अन्य पक्षांच्या नेत्यांचा भाजपमध्ये समावेश करून त्यांना तिकीटही देण्यात आले आहे.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये समावेश करून त्यांना अमरावतीतून तिकीट दिले आहे. लुधियानामधून काँग्रेस नेते रवनीत सिंग बिद्व, पटियालामधून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर, कुरुक्षेत्रमधून काँग्रेस नेते नवीन जिंदाल, सिरसामधून काँग्रेस नेते अशोक तंवर, जालंधरमधून आम आदमी पार्टीचे खासदार सुशील कुमार, भर्तृहरी मेहताब यांना कटकमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांत नाराजी आहे. महताब यांनी नुकताच बीजेडीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

१०१ खासदारांचे कापले तिकीट
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बाजूला करून पक्षाबाहेरील नेत्यांना तिकिटे दिली. आतापर्यंत भाजपने २९१ पैकी २ १०१ विद्यमान खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक १४ खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. भाजपने एकापाठोपाठ एक काँग्रेस, आप आणि बीजेडीच्या नेत्यांना तिकीट वाटप केले आहे.

मेरठ, मंडीमध्ये उमेदावारी नव्या 'प्लॅन' नुसारच?
मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल आणि मंडीमध्ये अभिनेत्री कंगना राणौत यांना भाजपने तिकीट दिले आहे. स्थानिक दावेदारांमध्ये मात्र त्यामुळे निराशा आहे. भाजपचे नेते आता हा प्रत्यक्षात प्लॅन बी चा भाग असल्याचे सांगत आहेत. जेव्हा आपलेच नेते जिंकू शकत नाहीत तेव्हा इतर पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन तिकीट द्या, असा हा प्लॅन आहे. त्यानुसार भाजपने अनेक राज्यांमध्ये लोकसभेसाठी तिकीट वाटप केले आहे. प्लॅन बी कितपत यशस्वी होतो हे निकाल सांगणार आहेत.

अनेक उमेदवारांची माघार, पहिल्या टप्प्यातील चित्र स्पष्ट
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यचा शनिवारी अखेरचा दिवस होता. पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान होणार आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024: ...while ticket to other party leaders, chances of victory are important, BJP's plan B is ready for 370 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.