नरेंद्र मोदी करणार नाहीत सोप्या जागांवर प्रचार, महाराष्ट्रात सध्या १८ सभांचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 06:59 AM2024-04-06T06:59:24+5:302024-04-06T07:00:22+5:30

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक सभांचे आयोजन कमकुवत जागांवर केले जात आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील चित्र बदलेल, असे भाजपला वाटते. महाराष्ट्रात मोदी १८ सभा घेणार आहेत. ही संख्या २४ होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

Lok Sabha Election 2024: Narendra Modi will not campaign in easy seats, currently planning 18 meetings in Maharashtra | नरेंद्र मोदी करणार नाहीत सोप्या जागांवर प्रचार, महाराष्ट्रात सध्या १८ सभांचे नियोजन

नरेंद्र मोदी करणार नाहीत सोप्या जागांवर प्रचार, महाराष्ट्रात सध्या १८ सभांचे नियोजन

- संजय शर्मा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक सभांचे आयोजन कमकुवत जागांवर केले जात आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील चित्र बदलेल, असे भाजपला वाटते. महाराष्ट्रात मोदी १८ सभा घेणार आहेत. ही संख्या २४ होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

भाजपने ३७० जागा जिंकण्याच्या उद्देशाने प्रचार सुरू केला आहे. मोदी यांनी पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, सोप्या जागांवर प्रचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. पंतप्रधान फक्त अशाच जागांवर प्रचारासाठी जातील जिथे त्यांच्या सभांमुळे परिस्थिती बदलू शकते व ज्या जागा अवघड मानल्या जात आहेत.

यूपीत सर्वाधिक सभा
उत्तर प्रदेश -  ३०
बिहार - १८ 
पश्चिम बंगाल - १८ 
गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीत मोदींच्या सभा सर्वांत कमी होतील. दक्षिण भारतात कर्नाटकमध्ये डझनभर सभाही प्रस्तावित आहेत.

 

Web Title: Lok Sabha Election 2024: Narendra Modi will not campaign in easy seats, currently planning 18 meetings in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.