Mohan Yadav : "काँग्रेस पराभूत झालेली लढाई लढतेय, आम्ही सर्व रेकॉर्ड मोडणार; 'ही' विजयाची लक्षणं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:51 IST2024-03-27T16:38:47+5:302024-03-27T16:51:01+5:30
Lok Sabha Election 2024 And Mohan Yadav : डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी जबलपूर येथे भाजपा उमेदवार आशिष दुबे यांच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला.

Mohan Yadav : "काँग्रेस पराभूत झालेली लढाई लढतेय, आम्ही सर्व रेकॉर्ड मोडणार; 'ही' विजयाची लक्षणं"
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी जबलपूर येथे भाजपा उमेदवार आशिष दुबे यांच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला. भाजपा उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काँग्रेस पराभूत झालेली लढाई लढत आहे. यावेळी आम्ही सर्व रेकॉर्ड मोडणार आहोत.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस होता. जबलपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आशिष दुबे यांनी धूमधडाक्यात, मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या समर्थनार्थ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही रॅलीत सहभाग घेतला होता.
प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा, कॅबिनेट मंत्री प्रल्हाद पटेल, राकेश सिंह आणि कैलाश विजयवर्गीय यांनीही उमेदवारी रॅलीत सहभागी होऊन आशिष दुबे यांचा उत्साह वाढवला. रॅलीदरम्यान यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते आणि अधिकारी मोदी सरकारच्या घोषणा देत फिरत होते. त्यांच्या हातात पंतप्रधान मोदींचे कट आऊटही दिसत होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले की, "यावेळी भाजपा विक्रमी मतांनी विजयी होणार आहे. आशिष दुबे यांच्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. ज्याप्रकारे जनतेमध्ये उत्साह आणि जल्लोष दिसत आहे, ही विजयाची लक्षणं आहेत आणि काँग्रेस पराभूत झालेली लढाई लढत आहे. आपले राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाच्या बरोबरीने वाटचाल करत आहे. वातावरण जबरदस्त आहे आणि आम्ही सर्व रेकॉर्ड मोडू"